शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

१२ श्वानांच्या मालकांना ताबा देण्यास न्यायालयाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात श्वानांचा अनधिकृत सांभाळ करताना तसेच त्यांचे ब्रिडिंग (प्रजनन) करताना त्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात श्वानांचा अनधिकृत सांभाळ करताना तसेच त्यांचे ब्रिडिंग (प्रजनन) करताना त्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याच्या प्रकरणात प्राणीप्रेमी मेनका गांधी यांच्या पीपल फॉर ॲनिमल्सने पोलिसांमार्फत कारवाई करून १२ श्वान ताब्यात घेतले होते. या श्वानांना मूळ मालकाच्या ताब्यात देण्यास न्यायालयाने नकार देत त्यांचा ताबा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

पीपल फॉर ॲनिमल्सच्या पुणे जिल्हा अध्यक्षा पुनीत खन्ना व विनिता टंडन यांनी पोलिसांच्या मदतीने १२ श्वानांची लोणी कंंद परिसरातून सुटका केली होती. श्वानांची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा त्यांच्या त्वचेला इजा झाल्याचे दिसून आले. त्यांचा क्रूरतेने सांभाळ केला जात असल्याचे दिसून आले.

श्वानांच्या मालकाने श्वानाचा ताबा मिळावा, असा अर्ज न्यायालयात केला होता. न्यायालयात पीपल फॉर ॲनिमल्स यांच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. अशितोष शेळके यांनी बाजू मांडली आहे. न्यायालयाने मूळ मालकाला श्वानांचा ताबा देण्यास नकार दिला. तर, संबंधित व्यक्तीला या श्वानाचा सांभाळ व वाहतूक खर्च प्रतिदिन २६० रुपये प्रमाणे एक वर्षाचा खर्च द्यावा, असे आदेश दिले आहेत. तसेच, हा खर्च व श्वान पुढील ७ दिवसांत जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती यांच्याकडे देण्याचा ताबा द्यावे, असे म्हटले आहे.

श्वानांचे ब्रिडिंग (प्रजनन) करण्यासाठी शासनाची परवानगी लागते. तसा परवाना मिळतो. मात्र या व्यक्तीकडे परवाना नाही. तर सांभाळ करण्यासाठी देखील परवानगी लागते. ती देखील नाही.

............

फक्त ५ जणांकडे प्रजननाची परवानगी

कुत्री, मांजरी पाळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यासाठी परदेशी जातीच्या कुत्र्यांना अधिक मागणी आहे. त्यामुळे त्यांचे प्रजनन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्राण्यांचे प्रजनन करायचे असेल, तर त्यासाठी परवानगी आवश्यक असते. सध्या शहरात अशा प्रकारे कोणतीही परवानगी न घेता प्रजनन करणारे शंभरावर व्यक्ती, संस्था आहेत. त्यापैकी केवळ ५ संस्थांनी रितसर परवानगी घेतली आहे, असे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.