शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचे कामकाज आजपासून दोन शिफ्टमध्ये दोन तासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील न्यायालयीत कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील न्यायालयीत कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली लागू केली आहे. उद्यापासून (दि.७) न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये दोन तासच सुरू राहणार आहे. तसेच महिन्यातील प्रत्येक शनिवारी न्यायालयातील कामकाज बंद ठेवणार आहे. त्या दिवशी फक्त रिमांड आणि महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

राज्यासह पुण्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने कहर केला आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उच्च न्यायालयाने कामकाजाबाबत नवीन नियमावली लागू केली आहे.

नव्या नियमावली नुसार, सध्या न्यायालयामध्ये अडीच तासाच्या दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू आहे. मात्र, ७ एप्रिलपासून न्यायालयातील कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू राहील. मात्र, शिफ्ट अडीच तासाची न राहता ती दोन तासांची करण्यात आली आहे. शक्यतो खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घ्यावी. न्यायालय वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी यांच्या गैरहजेरीत कोणताही आदेश देणार नाहीत. न्यायालयाच्या आवारामध्ये कँटीनमध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहील. न्यायालयामध्ये दैनंदिन बोर्डावर मोजक्याच कामांचा उल्लेख करण्यात येणार आहे. बोर्डावर उल्लेख असलेल्या खटल्यांचेच कामकाज त्या दिवशी चालेल. तसेच संबंधित खटल्यातील पक्षकार, वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत, असे पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन हिंगणेकर यांनी सांगितले.

-----

चौकट

५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज

कौटुंबिक न्यायालयातील कामकाज देखील सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. तसेच न्यायालयामध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू राहणार आहे. यावेळी अनुपस्थित पक्षकार, वकिलांच्या विरुद्ध कोणताही आदेश दिला जाणार नाही. गरज असेल तरच पक्षकार, वकीलांनी न्यायालयात उपस्थित रहावे, असे दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी सांगितले.