शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रोडरोेमिओंचे समुपदेशन

By admin | Updated: November 18, 2016 06:00 IST

हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या निर्भया पथकाने गेल्या काही दिवसांत

लोणी काळभोर : हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या निर्भया पथकाने गेल्या काही दिवसांत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. रोमियोगिरी करणाऱ्या तब्बल २०० मुलांना आई-वडिलांसोबत कार्यालयात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान म्हणाल्या, ‘‘गेल्या ३ महिन्यांत तब्बल २०० मुलांवर या पथकाने कारवाई केली आहे. हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या निर्भया पथकात लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान, पोलीस कर्मचारी विनोद हाके (वेल्हा पोलीस ठाणे), वैजनाथ नागरगोजे (लोणी कंद पोलीस ठाणे), महिला पोलीस रेश्मा खंकाळ (लोणी काळभोर पोलीस ठाणे) व स्वाती जाधव (हवेली पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.लोणी काळभोर, लोणी कंद, हवेली व वेल्हा या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खासगी गाडीने व साध्या वेषात फिरून हे पथक कारवाई करते. प्रत्येक आठवड्यातील रविवार ते शुक्रवार या कालावधीत कारवाई केलेल्या युवकांना शनिवारी समुपदेशनासाठी आईवडील किंवा पत्नीसह बोलावले जाते. या निर्भया पथकाकडे छुपे कॅमेरे असतात. शाळा, महाविद्यालय, बाजार, महिला वसतिगृह, सिनेमागृह, उद्यान, बसस्थानक, रेल्वेस्थानक, विविध कंपन्या, ज्या ठिकाणी महिला, मुली असतात, तेथे जाऊन हे पथक छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून छेडछाडीचे रेकॉर्डिंग करण्यात येते. नंतर सदर युवकाला आपले आईवडील किंवा पत्नीला सोबत घेऊन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत येथे असलेल्या हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात शनिवारी बोलावले जाते. तेथे त्याचे समुपदेशन केले जाते.