शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सराईत’ तयार होऊ नयेत यासाठी गुन्हेगारांचे समुपदेशन

By admin | Updated: January 5, 2015 00:59 IST

गुन्हेगारीच्या एखाद्या कृत्याने ‘सराईत’पणाचा शिक्का बसणाऱ्यांची संख्या वाढत असून, होतकरू तरुणांचे आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी पोलिसांकडून आता समुपदेशन करण्यात येणार

लक्ष्मण मोरे, पुणेगुन्हेगारीच्या एखाद्या कृत्याने ‘सराईत’पणाचा शिक्का बसणाऱ्यांची संख्या वाढत असून, होतकरू तरुणांचे आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी पोलिसांकडून आता समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था आणि मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. गेल्या १० वर्षांत पुण्यात विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या काळात ४६ जणांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यातील तब्बल १३ हजार गुन्हे हे हाणामारीच्या घटनांचे आहेत. हाणामारीच्या एखाद्या घटनेत तरुणाचा किरकोळ सहभाग असला, तरी त्याच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो. यातून अनेकदा हे तरुण सावरतच नाहीत, असे पुणे पोलिसांनी केलेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. याबाबत परिमंडळ २ चे उपायुक्त सुधाकर पठारे म्हणाले, ‘‘ चार महिन्यांपूर्वी हमालनगर येथे एक मारामारीची घटना घडली होती. जखमीने संशयितांच्या सांगितलेल्या नावांमध्ये दोन अगदी हुशार नवयुवकांचा सहभाग होता. इतरांना जामीन मंजूर झाला; परंतु या दोघांना मात्र झाला नाही. त्यांना मदत करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र, पुरावे या दोघांविरुद्ध या तरुणांना कारागृहातच राहावे लागले. ही एक घटना समोर आली,परंतु कदाचित असे अनेक तरुण चुकीमुळे वा गैरसमजुतीने गुन्हेगारीकडे येणे टाळण्यासाठीच पोलिसांकडून गुन्हेगारांचे समुपदेशन करण्याची कल्पना सुचली.’’पोलिसांनी गेल्या दहा वर्षांच्या गुन्हेगारीच्या केलेल्या अभ्यासात ‘रेकॉर्डवरील गुन्हेगार’ ही संख्या वाढत आहे. पुण्यात सध्या १०,५०२ रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर, जामिनावर सुटल्यावर किंवा कारागृहातून बाहेर आल्यावर दुसऱ्यांदा गुन्हा करणाऱ्यांची संख्या साडेतीन हजारांवर आहे. पुण्याच्या लोकसंख्येत गुन्हेगारीचे प्रमाण १ टक्का असले, तरी त्याचा समाजावर होणारा परिणाम मोठा आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखतानाच ‘सराईत’ तयार होऊ नये, यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे. ’’या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘संवाद परिवर्तनाचा’ या उपक्रमात पोलिसांनी शहरातील सर्व झोपडपट्ट्या, महाविद्यालयांमधील तरुणांबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा तरुणांनाही बोलावले होते. पोलिसांना शत्रुत्वाच्या नजरेतून पाहणारे गुन्हेगार किमान यानिमित्ताने पोलिसांशी संवाद साधतील.