शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर, मेथी बाजारातून गायब

By admin | Updated: May 28, 2015 23:20 IST

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीला अनुक्रमे शेकडा ४००० ते ५००० रुपये आणि शेकडा २५०० ते ३००० रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळत आहे़

निरगुडसर : सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीला अनुक्रमे शेकडा ४००० ते ५००० रुपये आणि शेकडा २५०० ते ३००० रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळत आहे़ त्यामुळे शेतकरी स्थानिक आठवडे बाजारात शेतमाल विकण्याऐवजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत़ किरकोळ विक्रीपेक्षा बाजार समितीत एकरकमी पैसे मिळत आहेत़ परंतु, यामुळे आठवडे बाजारातून कोथिंबीर, मेथी गायबच झाली आहे़कमी कालावधीत मिळणारी पिके म्हणून याकडे पाहिले जाते़ मेथी २१ दिवसांत, कोथिंबीर ४५ दिवसांत तयार होते़ त्यामुळे उन्हाळी हंगामात हमखास आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो़ परंतु, पाणीटंचाई आणि कडक उन्हामुळे मरतुकीचे प्रमाण वाढत आहे़ शेतकऱ्यांकडून मागणीइतका पुरवठा होत नसल्यामुळे भाव वाढल्याचे स्थानिक व्यापारी सीताराम चासकर, विकास वाघमारे, राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)४कडक उन्हामुळे कोथिंबीर आणि मेथी पिकाची उगवण चांगली होऊनदेखील पहिल्या आठवड्यात मरतुकीचे प्रमाण वाढते़ ४शेतकऱ्यांनी घेतलेल्या एकूण उत्पादनापैकी ४० ते ५० टक्के उत्पन्न विक्रीसाठी बाजार समितीत पोहोचते़ त्यामुळे एकूणच बाजारात मालाची आवक कमी होते़ ४सध्या लग्नसराई, सत्यनारायणाची महापूजा, वास्तुशांती आदी कार्यक्रमांमध्ये त्याचप्रमाणे रोजच्या आहारामध्ये महत्त्वाचा भाजीपाला म्हणून कोथिंबीर आणि मेथीकडे पाहिले जाते़ ४त्यामुळे या भाजीपाल्याची मागणी बाजारपेठेत वाढली आहे.