शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीसाठी पावणे दोनकोटींचा खर्च

By admin | Updated: November 16, 2015 01:54 IST

पंप हाऊसमधील पंपांचे नूतनीकरण, जलवाहिनी टाकणे, व्हॉल्व्ह बसविणे या विविध ठिकाणच्या तीन कामांसाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत

पिंपरी : पंप हाऊसमधील पंपांचे नूतनीकरण, जलवाहिनी टाकणे, व्हॉल्व्ह बसविणे या विविध ठिकाणच्या तीन कामांसाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालिकेत होणाऱ्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या भोसरी, लांडेवाडी पंप हाऊसमधील दिघी रोड येथील पंपाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ७४ लाख ६८ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. एका ठेकेदाराने वीस टक्के कमी दराची निविदा या कामासाठी सादर केली आहे. यासह लांडेवाडी पंप हाऊसमधील आळंदी रोड येथील पंपाचेही नूतनीकरण करण्यात येणार असून, यासाठी ४८ लाख ४४ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी ठेकेदाराने २२ टक्के कमी दराची निविदा सादर केली आहे. तसेच सेक्टर क्रमांक २३ आणि २६ मधील दुर्गेश्वर पथ या परिसरात ठिकठिकाणी जलवाहिनी टाकणे, जोड करणे, व्हॉल्व्ह बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी २० टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाली आहे. या तिन्ही कामांसाठी एक कोटी ६५ लाखांचा खर्च येणार असून, त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्रिवेणीनगर चौकापासून सहयोगनगरमध्ये जाणाऱ्या बारा मीटर रस्ता विकसित करणे तसेच पावसाळी गटार योजना तयार करण्याच्या ४१ लाखांच्या खर्चाचा विषय समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.(प्रतिनिधी)