शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोणीभापकरमधील विकासकामांत गैरव्यवहार

By admin | Updated: January 12, 2017 01:46 IST

बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील सहा सार्वजनिक कामांसाठी ४३ लाख रुपयांचा निधी आला होता. मात्र, ही सर्व कामे अपूर्ण

मोरगाव : बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील सहा सार्वजनिक कामांसाठी ४३ लाख रुपयांचा निधी आला होता. मात्र, ही सर्व कामे अपूर्ण असून निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यामध्ये ठेकेदाराने ग्रामसेवकांना हाताशी धरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी विद्यमान ५ ग्रामपंचायत सदस्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.लोणीभापकर-भोसलेवस्ती रस्त्यासाठी ११ लाख ५० हजार रुपये, शिदेंमळा रस्ता नऊ लाख रुपये, दलितवस्ती सभागृहसाठी नऊ लाख रुपये, मदने - शिंदेमळा भापकरवस्ती अंगणवाडीसाठी सहा लाख रुपये, प्राथमिक शाळा संरक्षक भिंत ४ लाख पन्नास हजार रुपये, स्मशानभूमी सुशोभीकरण तीन लाख रुपये. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, बारामती गटविकास अधिकारी यांना विद्यमान सदस्य ज्योती विजय बारवकर, सुदाम अप्पा मदने, दत्तात्रय रघुनाथ जगदाळे, रूपाली सोमनाथ पवार, लक्ष्मी कांतिलाल मदने यांनी दिलेल्या निवेदनात ही कामे निकृष्ट दर्जाची व अपूर्णावस्थेत असल्याने ठेकेदार, ग्रामसेवक व सरपंचांनी संगतमताने गावासाठी आलेला निधीचा गैरवापर केला असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शासनाकडून या कामांसाठी अद्याप अंतिम टप्प्यासाठी निधी आला नाही. तर काही कामे अंतिम टप्प्यात असल्याने केलेले आरोप खोटे आहेत. कामांचा दर्जा चांगला आहे, असे ग्रामसेवक नितीन शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)