शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांकडून वळसेंसाठी ‘कॉरिडॉर’

By admin | Updated: December 14, 2015 00:28 IST

कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना तातडीने नगर रस्त्यावरच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘कॉरिडॉर’ तयार केला

पुणे : कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना तातडीने नगर रस्त्यावरच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘कॉरिडॉर’ तयार केला. भारती हॉस्पिटलपासून रुबी हॉस्पिटलपर्यंतचे अंतर अवघ्या १४ मिनिटात गाठणे शक्य झाल्यामुळे त्यांना वेळेत उपचारही मिळू शकले. पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वळसे पाटलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार होते. त्यासाठी वाहतूक शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर येण्याचे आदेश देण्यात आले. कात्रजच्या भारती हॉस्पिटलपासून रुग्णवाहिकेमधून त्यांना सातारा रस्ता, मार्केट यार्ड, वखार महामंडळ, सेव्हन लव्हज चौक, रास्ता पेठ, समर्थ पोलीस ठाणे मार्गे, पोलीस आयुक्तालयावरून जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल रुग्णालयात नेण्यात आले. या मार्गावरील सर्व वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. रुग्णवाहिका पुढे गेल्यानंतर पाठीमागील वाहतूक सुरळीत करण्यात आली. अवघ्या १४ मिनिटांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ही रुग्णवाहिका रुग्णालयात पोचली. पुणेकर वाहनचालकांनी केलेल्या सहकार्याबाबत आवाड यांनी त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)