शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

स्वच्छतागृहांसाठी पालिकेला सिंगापूरच्या कंपनीचे साह्य

By admin | Updated: October 2, 2016 05:46 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधून देशात पहिला क्रमांक मिळविलेल्या महापालिकेने आता सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी

पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधून देशात पहिला क्रमांक मिळविलेल्या महापालिकेने आता सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी सिंगापूरमधील एका संस्थेचे साह्य घेतले आहे. त्यांच्या मदतीने शहरात आधुनिक स्वरूपाची सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत.वर्ल्ड टॉयलेट आॅर्गनायझेशन अशा नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या या संस्थेचे प्रमुख जॅक सीम यांना पालिकेने केलेल्या या विक्रमाची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी स्वत: पालिकेशी संपर्क साधला. जॅक हे जगभर टॉयलेट या क्षेत्रात काम करतात. जगातील अनेक देशांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी यासाठी सहकार्य केले आहे. आजाराचे सर्वांत मोठे कारण नैसर्गिक विधींसाठी योग्य सुविधा नसतात, हेच असल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी राहायचे असेल, तर स्वच्छ शौचालये, स्वच्छतागृहे हेच सर्वांत स्वस्त औषध आहे, असे ते म्हणाले.महापालिका आयुक्त कुणाल कुमार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप या वेळी उपस्थित होते. पालिकेने महिलांसाठी मोबाईल टॉयलेट तयार केली आहेत. त्याचे उद््घाटन रविवारी सकाळी बालगंधर्व रंगमदिरात होणार आहे. त्याचीही माहिती या वेळी देण्यात आली. सर्व सोयींनी उपयुक्त अशी स्वच्छतागृहे तयार करण्याबाबत जॅक यांची ख्याती आहे. ते या बाबतीत पालिकेला सहकार्य करणार आहेत, असे आयुक्त म्हणाले. सर्वाधिक दुर्लक्षित अशा या विषयाला महत्त्व देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (प्रतिनिधी)