शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची ६५ कोटी १६ लाख फरकाची रक्कम महापालिकेने द्यावी, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा लढा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 16:54 IST

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १६ एप्रिल २०१८ ला झाली असून महापालिका आयुक्तांनी २० जून २०१८ पूर्वी कामगारांची देय रक्कम अदा करावी, असे आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देकंत्राटदार बदलले तरी कंत्राटी कामगारांना सेवेत कायम घेण्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णयकंत्राटी कामगारांना मिळणार फरकाची रक्कम 

पिंपरी : कंत्राटी सफाई कामगारांना पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत कायम रूजू करून घ्यावे, कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन द्यावे, फरकाची रक्कम कामगारांना अदा करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने २००४ मध्ये दिले . पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाकडून या निर्णयावर स्थगिती आदेश मिळविले. १२ जानेवारी २०१६ ला उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटाळली. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १६ एप्रिल २०१८ ला झाली असून महापालिका आयुक्तांनी २० जून २०१८ पूर्वी १८ टक्के व्याजासह ६५ कोटी १६ लाख ८ हजार १४० कामगारांची देय रक्कम अदा करावी, असे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाविरोधात २००१ मध्ये दाखल दाव्याच्या सुनावणीत कंत्राटदार बदलले तरी कंत्राटी कामगारांना सेवेत कायम घेण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा २००४ मध्ये निर्णय झाला. तसेच किमान वेतन देण्याबाबतच्या कामगार आयुक्तांनी आदेश दिले. या निर्णयाची अंमलबजावणी करून १९९८ ते २००४ पर्यंतच्या १६ कोटी ८० लाख २ हजार २०० रुपये अशी फरकाची रक्कम कामगारांना अदा करावी. असे आदेश उच्च न्यायालयाने २००४ मध्येच दिले होते. महापालिकेने या निर्णयाविरूद्ध आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करून स्थगिती मिळविली. दरम्यान महापालिकेने कामगारांना कामावरून कमी केले. २०१४ मध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेऊन महापालिकेची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, याकडे श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी कामगारांचे आंदोलन करून लक्ष वेधले. आयुक्तांना नोटीसही बजावली. तरीही अंमलबजावणी न झाल्याने आघाडीने महापालिका आयुक्तांविरोधात न्यायालय अवमान प्रकरणी याचिका दाखल केली. या अवमान याचिकेवर १६ एप्रिल २०१८ ला सुनावणी झाली. महापालिका आयुक्तांनी २० जूनपुर्वी व्याजासह रक्कम द्यावी. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास न्यायालयात हजर राहावे, असेही आदेश् न्यायालयाने दिले आहेत. 

कंत्राटी कामगारांना मिळणार फरकाची रक्कम 

महापालिकेतील ५७२ कंत्राटी सफाई कामगारांना फरकाची एकुण रक्कम १६ कोटी ८० लाख २ हजार २०० रुपए, त्यावरील २०१५ पासूनचे १८ टक्के व्याज ४५ कोटी ३६ लाख ५ हीजार ९४० रुपए, अशी मिळुन ६५ कोटी १६ लाख ८ हजार १४० रुपये रक्कम महापालिकेने कामगारांना देणे आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड