शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : आजारापेक्षा इलाज भयंकर? लोणी काळभोर येथील लसीकरणासाठी केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 16:02 IST

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली.

लोणी काळभोर : राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी त्यात अनंत अडचणी आहेत. केंद्र शासनाने आज ( १ मे ) पासून १८ वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रावर या वयोगटाचे लसीकरणास सुरूवात झाली आहे. पोर्टल नीट काम करत नसल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर लसीकरण केंद्रांवर तरूणांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे आजारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती तर निर्माण होणार नाही ना ? याची भीती वाढली आहे. 

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली. आजच्या लसीकरणासाठी आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रूपाली बंगाळे यांनी आवश्यक ती सर्व तयारी केली होती. आज लस घेण्यासाठी या वयोगटातील सुमारे २५० ते ३०० नागरिकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. येथे जागा अपुरी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आले ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनाच लस दिली जाणार असे जाहीर करूनही ज्यांना एसमएमस मिळाले नाहीत तसेेेच शनिवार व रविवार लस मिळणार नाही हे जाहिर करूनही जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर आल्याने शनिवारी या गर्दीचे प्रमाण वाढले होते. 

सकाळी लसीकरण सुरू झालेनंतर प्रत्येकजण आलेला एसएमएस डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांना दाखवत होता. परंतू प्राथमिक आरोग्य केेंद्राचे संगणकावर दुपारी २ वाजले नंतर लस देण्यासाठी फक्त १०० जणांच्या नांवाची यादी आली असल्याने इतर नाराज होवून घरी परतले. परंतू काही महाभागांनी आम्हाला एसएमएस आला आहे. लस मिळालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. अखेर आरोग्य कर्मचारी, पोलीस यांनी त्यांना समजावून सांगितले नंतर येथील गर्दीचे प्रमाण कमी झाले.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या