शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक अडीच लाख! मेगा लसीकरणाला भरघोस प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 00:26 IST

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

ठळक मुद्देग्रामीण भागात १३ तालुक्यात १ लाख ७७ हजार ३२५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पुणे आणि पिंपरीत ६६ हजार ३९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले १ लाख ८९ हजार ४७२ जणांनी पहिला डोस घेतला. तर ४८ हजार ५९० नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला

पुणे : एकाच दिवसात अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करत जिल्ह्याने मंगळवारी (दि.३१) राज्यात लसीकरणाचा स्वत:चाच कीर्तीमान मोडत नवा कीर्तीमान प्रस्थापित केला.  बजाज समुहाने दिलेले दीड लाख डोस आणि शासनाकडे उपलब्ध असलेल्या लसी यातून राबविण्यात आलेल्या मेगा लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ५५९ लसीकरण केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली होती. आतापर्यंत जिल्ह्याला ८० लाख ३१ हजार लसींचे डोस मिळाले.  

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला बजाज समुहाने सकारात्मक  प्रतिसाद  देत दीड लाख कोविशिल्डच्या लस दिल्या. तर शासनाच्या ६० हजार लसींचे डोस यातून मंगळवारी (दि.३१) मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली.ग्रामीण भागातील ५५९ केंद्रावर दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर पुणे आणि पिंपरी मिळून दोन लाखापर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट प्रशासनाचे होते. मेगा लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषदेने जंगी तयारी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे तसेच सर्व सदस्यांनी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते.

ग्रामीण भागात १३ तालुक्यात १ लाख ७७ हजार ३२५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर पुणे आणि पिंपरीत ६६ हजार ३९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.  यात १ लाख ८९ हजार ४७२ जणांनी पहिला डोस घेतला. तर ४८ हजार ५९० नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मोजक्याच दिवशी लाखाहून अधिक लसीकरण झाले आहे.  एप्रिल महिन्याच्या ५ तारखेला ८५ हजार १४६ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. २६ जूनला १ लाख २९ हजार ९२३ लसीकरण झाले होते. २६ जूनला १ लाख १५ हजार ९४३, २८ जूनला १ लाख ४ हजार १४४, ३ जुलै १ लाख ४ हजार २४९,  १० जुलैला १ लाख १९ हजार ७०६, १४ ऑगस्टला १ लाख ८३५ हजार, २१  ऑगस्टला १ लाख २ हजार २७४, तर २६ ऑगस्टला १ लाख १५ जणांचे लसीकरण झाले.

कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी लसीकरण हाच सध्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. १ मार्चपासून सामान्य नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. एप्रिल महिन्यात दोनदा, जून महिन्यात तीनदा, जुलै महिन्यात दोनदा, तर ऑगस्ट महिन्यात तीनदा एक लाखांहून अधिक लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला सध्या एका महिन्याला १०-१५ लाख लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त ५० हजार लसीकरण करणे शक्य होत आहेत. मंगळवारी एकाच दिवसांत अडीच लाख नागरिकांचे लसीकरण झाल्याने नवा कीर्तीमान पुणे जिल्ह्याने प्रस्तापित केला आहे.

जिल्ह्यात अडीच लाखांच्या आसपास लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचे एकाच दिवसांत झालेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. लसींचा असाच पुरवठा झाला तर येत्या काही दिवसांतच उरलेल्या सर्वांचे लसीकरण करता येणार आहे. सामाजिकदायित्व निधीतून आणि शासनाकडून जास्तीत जास्त लस मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. - निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

मेगा लसीकरण मोहिमेसाठी बजाज कंपनीतर्फे आणि शासनाकडून मिळालेल्या लसींमधून मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्व तालुक्यांना लाभार्थ्यांच्या हिशोबाने लस पुरवठा करण्यात आला. सकाळपासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्रांनीही लसीकरणाचे चांगले नियोजन केल्याने जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण आज होऊ शकले. -आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस