शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्या वाढल्या, पण बाधितांची टक्केवारी सात टक्क्यांच्या आतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन कोरोना चाचणीचे प्रमाण गेल्या तीन-चार दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन कोरोना चाचणीचे प्रमाण गेल्या तीन-चार दिवसांपासून हजार ते दीड हजाराने वाढले असले, तरी करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी (तपासणी) च्या तुलनेत कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण मात्र ७ टक्क्यांच्या आतच असल्याचे समाधानकारक चित्र शहरात आहे़

रविवारी शहरात ४ हजार ८२ जणांनी कोरोना चाचणी केली, यापैकी केवळ २९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ मात्र, यातील बहुतांशी जण हे लक्षणेविरहित आहेत़ दरम्यान, शहरातील सक्रिय रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह) ही गेल्या आठ महिन्यांत प्रथमच तीन हजाराच्या आत आली आहे. आजमितीला शहरात केवळ २ हजार ९०९ सक्रिय रुग्ण आहेत़ यापैकी सुमारे ७० टक्के रुग्ण हे होम आयसोलेशन (गृहविलगीकरण) मध्येच आहेत़ तसेच, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ‘लोकमत’ला दिली़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरात ४२० जण कोरोनामुक्त झाल्याची नोंद घेतली आहे़ तर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २५० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १५५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या आजमितीला ६४२ इतकी आहे़ आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६४७ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ९ लाख २९ हजार २६१ जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी १ लाख ७९ हजार ५९८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७२ हजार ४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़