शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने आणले गोर-गरिबांच्या शिक्षणावर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:11 IST

राहूल शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आले आहे. राेजीरोटीसाठी शहरात यावे लागल्याने ...

राहूल शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आले आहे. राेजीरोटीसाठी शहरात यावे लागल्याने राज्यातील शालाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्येच ही संख्या जास्त असल्याचेही आढळून आले आहे.

शालेय शिक्षण विभागाने शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांसाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात २५ हजार २०४ इतके विद्यार्थी शालाबाह्य आढळून आले. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने ही नुकतीच सादर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात ही मोहीम राबवता आली नाही. पिंपरी चिंचवड मनपा व नागपूर मनपा क्षेत्रातही ही मोहीम सुरू करता आली नाही.

कसे होते बालकांचे स्थलांतर ?

साधारणत: सप्टेंबरनंतर ही कुटुंबे, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या जवळच्या राज्यात स्थलांतर करतात. मोठ्या प्रमाणात कुटुंबे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहमदनगर येथे तर शेजारी असणाऱ्या कर्नाटक व गुजरात येथे स्थलांतर करतात. अनेक कुटुंबे वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे करण्यासाठी स्थलांतर करीत असतात.

-------------

कशी राबवली शोध मोहीम ?

कोरोना काळातही पर्यवेक्षीय अधिकारी, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शालाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला. प्रत्येक गावात व शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, ग्रामीण भागातील बाजार, गुऱ्हाळ घर, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे या ठिकाणी भेटी दिल्या. तसेच स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नलवर/ रेल्वेमध्ये फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोककलावंताची वस्ती, विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्यास असलेल्या पालकांची बालके, मागास, वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती घेण्यात आली.

--------------

राज्यातील सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी मोठ्या शहरांमध्येच

मुंबई उपनगर - १० हजार १७७, पालघर - २ हजार २८५, पुणे - ३ हजार २७८, अहमदनगर - ४६३, नाशिक- १ हजार ८६७, नंदुरबार- १ हजार ३१६, जळगाव- ७१८, बीड- ३२२, नांदेड - १६०, अकोला- १ हजार ६४, चंद्रपूर - १०७, गडचिरोली- २७७,वर्धा - १७७.