शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे यंदा होळी, धूळवड साजरी करण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला असून, एका दिवसात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला असून, एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे २८ रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ रोजी साजरा होणारा धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

राज्यात तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक उपाय योजना करण्यात येत आहेत. यामुळेच जिल्ह्यात साजरे होणारे होळी व धूलिवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धूलिवंदन व रंगपंचमी हे सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे.

सदर मनाई आदेशाचे पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सदर आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ व कायद्यातील इतर तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.