शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृताच्या अंगावरील दागिने चोरणारी महिला जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST

पुणे : बाणेर येथील डेडिकेड कोविड हॉस्पिटलमधील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरून नेण्याचे ८ प्रकार उघडकीस आले आहेत. ...

पुणे : बाणेर येथील डेडिकेड कोविड हॉस्पिटलमधील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरून नेण्याचे ८ प्रकार उघडकीस आले आहेत. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका महिलेला ताब्यात घेतले आहे़ तर, तिला मदत करणाऱ्या तिच्या मित्राला अटक केली आहे.

शारदा अनिल अंबिलढगे (वय ३६, रा. रहाटणी फाटा, थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. रहाटणी गाव) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.

बाणेर येथे डेडिकेड कोविड हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये शारदा अंबिलढगे या कामाला आहेत. रुग्णांची देखभाल व तेथील साफसफाईचे काम त्या करतात. त्या प्रामुख्याने रात्रपाळीला कामावर होत्या. हे काम करीत असताना मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या अंगावरील दागिने त्या चोरत असत. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे तक्रारी केल्या. एका मागोमाग एक तक्रारी येऊ लागल्याने डॉक्टरांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात ही महिला रुग्णांच्या अंगावरील दागिने काढून घेत असल्याचे दिसून आले. हॉस्पिटलकडे ८ तक्रारी आल्या असून त्यात कोणाची अंगठी, गळ्यातील चेन, मोबाईल असा सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यानंतर अजयश्री मस्कर ( वय २५, रा. बाणेर) यांनी चतु:श्रुंगी पोलिसांकडे फिर्याद दाखल दिली आहे.

पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली़ त्यात तिने आपण हे दागिने अनिल संगमे याच्याकडे दिल्याचे व त्याच्यामार्फत विकल्याचे सांगितले. अनिल संगमे व शारदा अंबिलढगे यांनी संगनमत करून या चोऱ्या केल्या असून त्यातील दागिने विकण्यासाठी अनिल याने मदत केली असल्याचे चतु:श्रुंगी पोलिसांनी सांगितले.