शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कोथिंबीर झाली मातीमोल

By admin | Updated: December 27, 2014 22:52 IST

मेथी, कोथिंबीर यांचे बाजारभाव कमी झाले आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीला एक रुपया बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वसूल होत नाही.

मंचर : मेथी, कोथिंबीर यांचे बाजारभाव कमी झाले आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीला एक रुपया बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वसूल होत नाही. या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.कमी दिवसांत येणारे पीक म्हणून मेथी, कोथिंबिरीचे उत्पादन शेतकरी घेतो. एका महिन्यात हे पीक घेता येते, शिवाय मागील वर्षभरात दोन्ही पिकांना चांगला बाजारभाव मिळाला आहे. निसर्गाच्या तडाख्याने अनेकदा मेथी, कोथिंबिरीचे उत्पादन घटले. त्यावेळी आवक कमी होऊन या पिकांना उच्चांकी बाजारभाव मिळाला होता. मेथी कोथिंबिरीचे बी महागले आहे. शिवाय खते औषधे यांचा विचार केला, तर जास्त भांडवल शेतकऱ्यांना गुंतवावे लागत आहे.मागील पंधरा दिवसांपासून दरात घसरण होत आहे. गुरूवारी रात्री मेथीच्याा १३ हजार ६४२ जुड्यांची आवक झाली. त्यास शेकडा ५६० ते १०७५ रूपये बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीच्या २२ हजार ९१२ जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा १०१ ते ९०१ रूपये असा बाजारभाव मिळाला. शेपूला ३५१ ते ४५१ रूपये बाजारभाव मिळाला.बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भांडवली खर्च वाढतोय. वातावरण चांगले असल्याने उत्पादन चांगले निघते. मात्र या बाजारभावात शेतकऱ्यांचे भांडवल वसूल होणे अवघड आहे. शेतकरी बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहेत. मेथी, कोथिंबीर यांची आवक नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीपराव ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)