मंचर : कोथिंबिरीच्या बाजारभावात वाढ झाली असून, एक जुडी तब्बल 51 रुपयाला विकली गेली आहे. बाजारभाव वाढले असूनही कोथिंबिरीचे उत्पादन निघत नसल्याने शेतक:यांना अपेक्षित फायदा मिळत नाही.
कोथिंबिरीचे बाजारभाव दरदिवशी वाढत आहेत. या वर्षीचा सर्वाधिक बाजारभाव कोथिंबिरीला मंगळवारी रात्री मिळाला. शेकडा 5 हजार 1क्क् रुपये या भावाने लिलावात कोथिंबीर विकली गेली. बाजारभाव कडाडलेला असूनही शेतक:यांना अपेक्षित फायदा मिळत नाही.
पाऊस पडत नाही. तसेच, वाढलेली उष्णता यामुळे कोथिंबिरीची मर होते. त्यामुळे अगदी कमी
उत्पादन निघत आहे. बाजारभाव वाढले असूनही उत्पादन कमी निघत असल्याने शेतक:यांना कमी उत्पन्न मिळत आहे.
दरम्यान, कोथिंबिरीच्या दहा हजार जुडय़ांची आवक मंचर
बाजार समितीत झाली. शेकडा
5 हजार 1क्क् बाजारभाव मिळाला. मेथीच्या 7 हजार 13क्
जुडय़ांची आवक होऊन शेकडा
23क्1 रुपये बाजारभाव मिळाला. शेपूला शेकडा 17क्क् रुपये बाजारभाव मिळत असल्याची माहिती
सचिव दिलीपराव ढमढेरे यांनी दिली.
(वार्ताहर)