शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

युतीची बैठक निर्णयाविनाच

By admin | Updated: January 22, 2017 04:55 IST

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे घोडे पुढे जात असताना भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यातील युतीचे गाडे मात्र आकड्यांच्या घोळातच अडकले आहे. डेक्कन येथील

पुणे : काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे घोडे पुढे जात असताना भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यातील युतीचे गाडे मात्र आकड्यांच्या घोळातच अडकले आहे. डेक्कन येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत शनिवारी काहीही निर्णय होऊ शकला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ आली तरीही अद्याप या दोन पक्षांमध्ये जागावाटपाचा प्राथमिक प्रस्तावदेखील तयार झालेला नाही. शनिवारच्या बैठकीत दोन दिवसांनी पुन्हा भेटण्याचा निर्णय झाला, एवढीच माहिती देण्यात आली.भाजपाचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, शहराध्यक्ष विनायक निम्हण यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. तीत कोणी किती जागा घ्यायच्या, यावर चर्चा झाली. मावळत्या पालिका सभागृहात भाजपाच्या २४ व शिवसेनेच्या १५ जागा आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातून सर्वाधिक ओघ भाजपाकडे सुरू आहे. त्याचाच फायदा घेत भाजपाकडून शिवसेनेला कमी जागा दिल्या जात आहेत. सेनेला मात्र जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळेच ही चर्चा पुढे जायला तयार नाही. (प्रतिनिधी) दोन दिवसांनी पुन्हा बैठकयुतीसाठी शनिवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीतही यावर काही निर्णय झाला नाही. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या म्हणण्यावर आग्रही राहिले. अखेरीस दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचीच माहिती पत्रकारांना देण्यात आली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाला जागावाटपात आपला वरचष्मा ठेवायचा आहे. सेनेला ते मान्य नाही. मावळत्या सभागृहात कमी जागा असल्या तरीही शहराच्या काही भागात सेनेचे चांगले वर्चस्व आहे. भाजपाने त्याचा विचार करावा, असे सेनानेत्यांचे म्हणणे आहे. बैठकीतील चर्चेतही पालिकेत सत्ता येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेनेने विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे भाजपाने सांगितले असल्याचे समजते.