शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरुषोत्तम’वर सीओईपीची मोहोर

By admin | Updated: January 8, 2016 01:44 IST

‘आव्वाज कोणाच्चा?’, ‘अभिनंदन!’, ‘आमच्याशिवाय आहेच कोण?’ अशा घोषणा... क्षणागणिक वाढत जाणारी उत्सुकता... डोळ्यांत प्राण आणून निकालाची वाट पाहणारे उदयोन्मुख कलाकार

पुणे : ‘आव्वाज कोणाच्चा?’, ‘अभिनंदन!’, ‘आमच्याशिवाय आहेच कोण?’ अशा घोषणा... क्षणागणिक वाढत जाणारी उत्सुकता... डोळ्यांत प्राण आणून निकालाची वाट पाहणारे उदयोन्मुख कलाकार... विद्यार्थ्यांचा अविरत जल्लोष... चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद, असे चित्र भरत नाट्य मंदिराच्या परिसरात पाहायला मिळाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) ‘पेनकिलर’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर मोहोर उमटवली आणि जल्लोषाने जणू परिसीमाच गाठली.महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित ‘पुरुषोत्तम करंडक’ या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक आणि मुंबई या ६ केंद्रांवर प्रथम आलेल्या २० एकांकिकांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये सीओईपीच्या ‘पेनकिलर’ने बाजी मारली. महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभात अभिनेता उपेंद्र लिमये, परीक्षक ज्योती सुभाष, डॉ. प्रवीण भोळे, प्रदीप वैद्य, सुहास जोशी हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपेंद्र लिमये म्हणाले, ‘‘कलेच्या क्षेत्रात सवंग, उथळपणा फोफावत असताना तरुणाईला उत्तम मार्गदर्शनाची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने कलाकार-परीक्षकांमध्ये संवाद घडला, मार्गदर्शन मिळाले तर कलाक्षेत्राला उत्तम कलावंत मिळतील. मी पुरुषोत्तमचे प्रॉडक्ट आहे, याचा मला अभिमान वाटतो. कलाकार म्हणून माझ्या घडण्याचे सगळे श्रेय मी पुरुषोत्तमलाच देतो. ते दिवस खूप जादुई, मंतरलेले होते. स्पर्धेसाठी मेहनत करण्याचे, जिंकण्याचे वेड लागले होते. पुरुषोत्तमसारखी स्पर्धा इतर कोणत्याही राज्यात नाही. आपल्याला १५० वर्षांची थिएटरची परंपरा आहे. अनेक कलाकार या स्पर्धेने घडविले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर मला पुरुषोत्तम करंडक मिळाल्यासारखे वाटले.‘‘तरुणांना या स्पर्धेच्या निमित्ताने काही गुरुमंत्र मिळाल्यास त्यांना दोषांवर मात करून स्वत:ला घडवता येईल आणि दर्जा जपता येईल.’’(प्रतिनिधी)