पुणो : ‘हात दाखविल्यावर बस थांबत नाही’, ‘ड्रायव्हर-कंडक्टरला माज आला आहे’, अशा शब्दांत प्रवाशांकडून अनेकदा तक्रार होते. परंतु, गच्च भरलेली बस थांबवून प्रवासी घेतले, तर ‘आरटीओ’कडून चालकावरच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न करणा:या कर्मचा:यांना लायसन्स परत मिळविण्यासाठी आरटीओ आणि पीएमपीचे उंबरे ङिाजविण्याची वेळ आली आहे.
एखादी बस प्रवाशांनी भरगच्च भरली असेल, तर प्रशासनाकडून दंड वसुली होते. मात्र, मागील आठवडय़ात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून काही चालकांवर कारवाई झाल्याचे दिसून आले आहे. कारवाई दरम्यान जादा प्रवासी
घेतले म्हणून, एका चालकाचा वाहन परवाना जप्त करण्यात आला. तब्बल दोन आठवडे उलटले तरी त्याला परवाना परत मिळालेला नव्हता. त्यामुळे असे चालक परवाना मिळेर्पयत विनापरवाना बस चालवित आहेत.
‘आरटीओ’च्या नियमानुसार बैठक मर्यादा आणि उभे राहण्याची प्रवाशांची क्षमता ठरवून देण्यात आली आहे. मात्र, पीएमपीकडे जादा बस उपलब्ध नसल्याने दररोज केवळ 12क्क् बस रस्त्यावर उतरत आहेत.
त्यामुळे क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांना घेणो चालक-वाहकांना अपरिहार्य
आहे. सामान्य प्रवासी,
आरटीओ अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना कर्मचा:यांना तोंड द्यावे लागत आहे.(प्रतिनिधी)
विद्याथ्र्याची
धोकादायक वाहतूक
शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत जादा संख्येने बस रस्त्यावर उतरविणो आवश्यक आहे. परंतु, बस उपलब्ध नसल्याचे सांगून जादा बस पाठविण्यात येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद, मामलेदार कचेरी, डेक्कन, नळस्टॉप, मनपा, शिवाजीनगर, विद्यापीठ परिसरातील बसथांब्यावर थांबलेल्या विद्याथ्र्याना लटकून प्रवास करावा लागत आहे.
पीएमपीच्या ढिसाळ नियोजनाचा फटका कर्मचा:यांना बसत आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता जादा बस रस्त्यावर उतरविण्याची आवश्यकता आहे.
- अशोक जगताप,
उपाध्यक्ष, पीएमटी कामगार
संघ (इंटक)
काचा आणि इंडिकेटर नसल्याने कारवाई
शहराबाहेर मोठय़ा प्रमाणात पीएमपीच्या बस धावतात. स्पेअर पार्टच्या कमतरतेमुळे काचा, इंडिकेटर, हेडलाईट नसल्याने आरटीओचे अधिकारी बसवर कारवाई करीत आहेत. मुख्यत्वे संध्याकाळनंतर उपनगरीय परिसरात कारवाई होत असल्याने सामान्य प्रवासी आणि कर्मचा:यांना मनस्ताप सहन करावा लागतो.