शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सिरमचे ‘कोव्हिशिल्ड’ नाव बदलण्यााठीचा वाद कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही आधी सुरुवात केली आहे, असे सांगून नांदेड येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही आधी सुरुवात केली आहे, असे सांगून नांदेड येथील ‘क्युटिस बायोटेक’ कंपनीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादीत करीत असलेल्या लशीवर आक्षेप घेतला आहे. सिरमने लस विकसित करावी मात्र या ट्रेडमार्कने नाही, अशी मागणी करणारा दावा कंपनीने जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे.

‘क्युटिस’ने हा दावा दाखल केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे यांनी ‘सिरम’ला नोटीस दिली आहे. ‘ट्रेडमार्क वापरण्याबाबत हरकत घेतल्याने याबाबत मनाई आदेश का देऊ नये? यावर तुमचे म्हणणे मांडा,’ असे नोटिसीत म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार आहे.

“आम्ही २९ एप्रिल २०२० रोजी ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कसाठी रजिस्टर कार्यालयाकडे अर्ज केला होता. ‘सिरम’ने ३ जून २०२० रोजी अर्ज केला. ‘ट्रेडमार्क’साठी अर्ज केल्यानंतर आम्ही कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझरसारखी उत्पादने ३० मे पासून बनवायला व त्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ही सर्व उत्पादने ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कखाली उत्पादित व विक्री केली जात आहेत. आता ‘सिरम’ने त्यांची लस ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने बाजारात आणण्याची तयारी केल्याने ट्रेडर्स आमची उत्पादने परत पाठवित आहेत आणि विक्रीस नकार नकार देत आहेत. त्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसू लागला आहे. यामुळे ‘सिरम’ने त्यांच्या लशीचे नाव बदलावे, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. ‘क्युटिस’ने ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, नांदेडच्या जिल्हा न्यायालयात यापूर्वी सिरमविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी तो दाखल करणे योग्य होणार नाही म्हणून पुण्याच्या जिल्हा न्यायालयात नव्याने दावा दाखल करण्यात आला आहे. ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर आम्ही आधी सुरू केला. ‘सिरम’ने ‘कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर करून लस बाजारात आणली तर त्यातून होणारा नफा ‘क्युटीस’ला द्यावा, असे ‘क्युटिस’चे वकील आदित्य सोनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

कोव्हिशिल्ड हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी ‘क्युटिस बायोटिक’ आणि ‘सिरम’ या दोन्ही कंपन्यांनी अर्ज केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीला हा ट्रेडमार्क देण्यात आलेला नसून, त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांनी आपली उत्पादने ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने उत्पादित करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.