शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण कक्ष कालबाह्य

By admin | Updated: March 21, 2016 00:58 IST

शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे.

पुणे : शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे. दुर्घटनेच्या वेळी तत्काळ कुमक व मदत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या या कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये बिघाड झाल्याने अंतर्गत संपर्क यंत्रणा कोलमडून पडली आहे. नियंत्रण कक्षातील शुक्रवारी अचानक बंद पडलेल्या दोन फोन लाइनची दुरुस्ती झाली असली तरी त्या पुन्हा कधी बंद पडतील याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या आत्पकालीन प्रसंगी तत्काळ व पुरेशी मदत पोहोचण्यात अग्निशमन प्रशासनास अपयशी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरामध्ये आत्पकालीन प्रसंगी तत्काळ मदत उपलब्ध करून देणे ही बीपीएमसी अ‍ॅक्टनुसार महापालिका प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी शहरामध्ये मुख्य अग्निशमन केंद्रासह १५ उपकेंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये ५०० अधिकारी व जवान कार्यरत आहेत. अग्निशमन दलाची सर्वाधिक भिस्त ही नियंत्रण कक्षावर अवलंबून असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ नजीकच्या केंद्राशी संपर्क साधून काही मिनिटांत अग्निशमनचे जवान त्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित असते, त्यासाठी नियंत्रण कक्षातून वेगाने हालचाली कराव्या लागतात.भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. नियंत्रण कक्षाचे ३ शिफ्टमध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये २० ते २५ जवान कार्यरत असतात. या कक्षामध्ये अद्यापही जुनाट यंत्रणेद्वारेच काम पाहिले जात आहे. तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती झाल्याने पोलीस, गुन्हे शाखा व इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांची नियंत्रण कक्ष अत्याधुनिक झाली असताना अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष मात्र खूप वर्षे मागे आहे. या कक्षाचे अद्याप संगणकीकरण झालेले नाही. येणारे कॉल्सची माहिती रजिस्टरवर नोंदवून ठेवावी लागते. ईपीबीएक्स बॉक्स बंद पडल्याने आता अंतर्गत फोनची यंत्रणाही बंद झाली आहे. त्यामुळे मोबाइलचा आधार आत्पकालीन प्रसंगात जवानांना घ्यावा लागतो आहे. भूकंप व इतर मोठ्या दुर्घटनामध्ये मोबाइलचे नेटवर्क आपोआप बंद पडते. त्या वेळी मोबाइलवर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. नियंत्रण कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये शॉटसर्किट होऊन तो बंद पडला आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. मात्र यामुळे कक्षात काम करणे जवानांना खूप अवघड झाले आहे. नेमका कोणता फोन वाजतो आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही.आत्पकालीन यंत्रणेचा स्मार्ट सिटीला विसरमहापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी ३ हजार कोटी रुपये खर्चाचा स्मार्ट सिटी आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रकल्पात आत्पकालीन यंत्रणेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. मोबाइल अ‍ॅप, सॉफ्टवेअर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बरेच काही घरबसल्या देण्याची कल्पना त्यांनी त्यामध्ये मांडली आहे. मात्र, आत्पकालीन यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेल्या अग्निशमनच्या जुनाट यंत्रणेमध्ये बदल करण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला आहे.