शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

‘ठेकेदारी’ने बारामती पालिकेची लूट

By admin | Updated: December 3, 2014 02:58 IST

नगरपालिकेत आरोग्य विभागाच्या अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. यातून स्वच्छतेसाठी ४४ ते ४५ लाख रुपये खर्च येत आहेत

बारामती : नगरपालिकेत आरोग्य विभागाच्या अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. यातून स्वच्छतेसाठी ४४ ते ४५ लाख रुपये खर्च येत आहेत. ठेकेदारीच्या नावाने नगरपालिकेत लूट सुरू आहे. असे असताना शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीचा ठराव चार महिन्यांपूर्वी झाला आहे. मात्र, ठेकेदारीतून कुरण चरायला मिळत आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी नगरपालिकेतील कायम कामगार आहेत, ठेकेदारी पद्धतीने स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने काम दिले आहे. तसेच शहरातील नगरपालिकेच्या व्यापार संकुुलाच्या सफाईसाठी ठेकेदारी पद्धतीने कामे दिली आहेत. तरीदेखील बारामती शहरात सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आलेले नाही. आॅगस्ट २०१४ पासून बारामतीत विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात बारामतीच्या रुग्णालयात डेंगी, गोचीडतापासह अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढलेली असताना, आरोग्य विभागाने लक्ष दिले नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. विषाणूजन्य रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ३ लोकांचा बळी बारामतीत डेंगीमुळे गेला. आरोग्य विभागाने मागणी केल्याप्रमाणे सर्व यंत्रणा देण्यात आल्या आहेत. ठरावीक नगरसेवकांच्या दिमतीला बारामती नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत. त्यामुुळेच आरोग्य निरीक्षकांची बदली होऊनदेखील त्यांना बारामती नगरपालिकेतून सोडण्यात आलेले नाही. काहीही कारणे दाखवून बदली थांबविली जाते. आरोग्य विभागाच्या कार्यालयातच ठेकेदारांचा सतत वावर असतो. ठेकेदारांच्या कामासाठी ठेवलेला कर्मचारी आरोग्य विभागाचा कारभार संभाळत असल्याचे छायाचित्रच नगरसेवक सुभाष ढोले यांनी सर्वसाधारण सभेत सादर केले. अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्याशिवाय हे होत नाही, असा थेट आरोपदेखील त्यांनी केला. ठेकेदारीला प्रोत्साहन देणारी मंडळी मालामाल झाली आहे. नागरिकांचे प्रश्न कायम आहेत. (प्रतिनिधी)