शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचा पगार थेट बँकेत

By admin | Updated: December 25, 2014 05:04 IST

महापालिकेच्या सांडपाणी, अतिक्रमण, वाहतूक, सुरक्षा, आरोग्य आदी विभागांमध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून ४ हजार कंत्राटी कामगार राबत आहेत.

पुणे : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ४ हजार कंत्राटी कामगारांचा पगार थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. बायोमेट्रिक हजेरी, अचानक भेटी देऊन पाहणी यांद्वारे ठेकेदारांवर योग्य वचक ठेवण्याच्या सूचना खातेप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिल २०१५ पासून करण्यात येईल.महापालिकेच्या सांडपाणी, अतिक्रमण, वाहतूक, सुरक्षा, आरोग्य आदी विभागांमध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून ४ हजार कंत्राटी कामगार राबत आहेत. महापालिकेकडून दर वर्षी त्यांच्या वेतनापोटी ५० कोटी रुपये पालिकेकडून ठेकेदारांना दिले जातात; मात्र त्यातले निम्मेच पैसे कंत्राटी कामगारांना मिळत असल्याचे उजेडात आले. कंत्राटी कामगारांच्या तटपुंज्या वेतनाचा सातत्याने पाठपुरावा ‘लोकमत’मधून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व खातेप्रमुखांची बैठक बुधवारी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी घेतली.महापालिकेकडून ठेकेदारांना चेकद्वारे पैसे दिले जातात. ठेकेदाराच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पगाराची रक्कम बँकेकडून परस्पर संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जावी. वेगवेगळ्या विभागांना अचानक भेट देऊन ठेकेदारांच्या रेकॉर्डची पाहणी केली जावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कंत्राटी कामगारांकडील रजिस्टर दाखविलेले कामगार प्रत्यक्षात कामावर हजर नसतात, अशी टीका नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली होती. त्यामुळे कंत्राटी कामगारांनाही बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सांडपाणी वाहिनीत उतरून मैला साफ करण्यापासून ते जीव धोक्यात घालून अतिक्रमण काढण्यापर्यंत अनेक कामे या कामगारांकडून केली जातात. महापालिकेशी झालेल्या करारान्वये ठेकेदारांकडून हे कंत्राटी कामगार पुरविले जात आहेत. कामगार वेतनाच्या नियमावलीनुसार दररोज ४३२ याप्रमाणे महिन्यातील साप्ताहिक सुट्या वगळता २६ दिवसांचा ११ हजार २३२ रुपया पगार या कामगारांना दिला जाणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात ५ हजार ते ८ हजारांपर्यंत अत्यंत तटपुंजी रक्कम त्यांना दिली जाते. उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांना निवेदन देऊन यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली होती. (प्रतिनिधी)