ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्टाझेनेका यांनी विकसित केलेल्या व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विकसित झालेल्या कोव्हिशिल्डला व भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वितरणासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी सीरमधील लसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आता प्रत्यक्ष लस वितरणाचा टप्पा सुरू होत आहे.
कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्सिन पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून विविध राज्यातील सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. लस वितरणाच्या मुख्य केंद्रावर लस वितरित होणार आहे. त्यासाठी कोल्ड स्टोअरेज ट्रक हडपसर येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सज्ज आहेत. ट्रकमध्ये लसीचे डोस अपलोड होतील. ते ट्रक मंगळवारी पहाटे ४ वाजता निघतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील अशी माहिती सूत्रांनी दिली.