पुणे : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे अपघात भरपाई, कामगाराच्या वारसास पेंशन, मुलांना शिष्यवृत्ती, बाळंतपणात मदत इ.१६ योजनांची लाभार्थी ओळखपत्र बांधकाम मजुरांना वितरित करण्यात आली.इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा राज्यात झाला. त्यानुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना होऊन कामकाज सुरू झाले. या मंडळाच्या आणि मजदूर सभेच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात बांधकाम मजुरांना सामाजिक सुरक्षेचे स्वातंत्र्य ६९ व्या स्वातंत्र्यदिनी मिळाले. अध्यक्षस्थानी हाजी नदाफ होते. पाहुण्यांच्या हस्ते योजना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. नगरसेवक लता राजगुरू, रशिद शेख, विठ्ठल गायकवाड, मयूर गायकवाड, सादिक लुकडे, प्रा. विकास देशपांडे आदी उपस्थित होते. कल्याणकारी मंडळात तीनशे बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना या योजनेची ओळखपत्रे व नोंदपुस्तिका कार्यक्रमात देण्यात आल्या. त्याचबरोबर आधी नोंदित असलेल्या २०० कामगारांना प्रत्येकी रु. ३०००, एकूण रु. ६ लाख एकवट मदतीची प्रकरणेही पूर्ण करण्यात आली. त्यांच्या रकमा संबंधित कामगारांच्या बॅँक खात्यात जमा होत असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. बांधकाम कामगारांच्या इ.१ ली ते पदवी, पदविका, वैद्यकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलांना वा पत्नीस रु. १२०० वार्षिक ते रु. ३५ हजार वार्षिक सह्याच्या ७ योजना, अपघातात ७५ %अपंगत्वत आल्यास रु. १ लाखापर्यंत साह्य, अंत्यविधीसाठी साह्य, विवाहासाठी रू.१० हजार अनुदान, तसेच कामगाराच्या कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारासाठी रु. २ लाखांचे विमा संरक्षण अशा इतर ९ योजना, एकूण सोळा योजनांचा यात समावेश आहे. या वेळी नितीन पवार म्हणाले, की आपले कष्ट व कौशल्यातून सृष्टीची रचना करणारे हे कामगार स्वत: मात्र नरकप्राय परिस्थितीत जगतात. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या रूपाने त्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंडळात नोंदणी करून घेऊन बांधकाम मजुरांनी त्याचा फायदा घ्यावा. ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी रशिद शेख यांच्या मार्गदर्शनानुसार शाहिन ज्येष्ठ नागरिक संघाच्या ६२ सभासदांना शासनाचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रेही देण्यात आली. त्यामुळे सभासदांना एस.टी., रेल्वेप्रवास, वैद्यकीय उपचार यात सवलतीचा लाभ मिळू शकेल. शाहिन पतसंस्थेचे अध्यक्ष मेहबूब नदाफ, सर्कलचे अध्यक्ष हुसेन जमादार, शौकत नदाफ, बाळू गोशी यांनी वरील उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. मेहबूब नदाफ यानी स्वागत केले.
बांधकाम मजुरांना मिळाले सामाजिक सुरक्षेचे कवच
By admin | Updated: August 18, 2015 03:56 IST