शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन कोटींच्या जलवाहिनीचे काम रखडले

By admin | Updated: May 7, 2017 02:33 IST

दौंड नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अंदाजे ३ कोटी ५६ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन जलवाहिनी

मनोहर बोडखे/  लोकमत न्यूज नेटवर्कदौंड नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अंदाजे ३ कोटी ५६ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन जलवाहिनी केवळ वनखात्याची परवानगी नसल्याने धूळखात पडलेली आहे. ‘धड तुला, ना मला’ या उक्तीनुसार पाणीपुरवठा योजनेबरोबरीनेच रेल्वे कुरकुंभ मोरीचे कामदेखील रखडलेले आहे, ते केवळ पाच कोटींच्या निधीच्या वादामुळे. वास्तविक पाहता वनखात्याची परवानगी घेऊन नवीन पाइपलाइन टाकण्याच्या संदर्भात निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु, नगर परिषदेने कुठलीही वनखात्याची परवानगी न घेतल्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम रेंगाळले आहे.रेल्वे कुरकुंभ मोरी या हेडखाली नगर परिषदेकडे ७ कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी या हेडखाली ५ कोटी रुपये नगर परिषदेला मिळाले. वास्तविक पाहता वरील १२ कोटी हे रेल्वे कुरकुंभ मोरीसाठी मिळालेले असल्याचे तत्कालीन आमदार रमेश थोरात यांचा दावा होता, तर तत्कालीन सत्ताधारी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांचे मत होते की, संबंधित ५ कोटी हे कुरकुंभ मोरीसाठी नव्हे तर वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी मिळालेले आहेत. तेव्हा ५ कोटीतील ३ कोटी ५६ लाख रुपये हे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी नगर परिषदेने निर्णय घेतला. हा निर्णय योग्य आणि चांगला असला, तरी जलवाहिनी टाकण्यासाठी वनखात्याची कुठलीही परवानगी न घेतल्यामुळे ही योजना गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली आहे. परिणामी वनखात्याच्या जागेत ठिकठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे पाइप धूळखात पडलेले आहेत. पाच कोटींच्या निधीचा बाऊ केला नसता, तर कुरकुंभ मोरीचे काम मार्गी लागले असते. परंतु, ५ कोटींच्या वादात कुरकुंभ मोरीच्या कामासह नवीन जलवाहिनीचे कामदेखील ढेपाळलेले आहे.पाणीपुरवठ्यासंदर्भात नियोजन चांगलेगेल्या वर्षी नगर परिषदेत नागरिक हित संरक्षण मंडळाची एकतर्फी सत्ता होती. शहराला समप्रमाणात पाणी मिळत नव्हते. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या पाइपचा व्यास ४.५0 मिलीमीटर होता त्यामुळे पाण्याची गती ही कमी प्रमाणात असायची, परंतु या व्यतिरिक्त ६00 मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन टाकली तर पाण्याची गती मोठी राहील आणि शहराला कुठेही कमीजास्त दाबाने पाणीपुरवठा होणार नाही, असे चांगले नियोजन होते. परंतु, वनखात्याची कुठलीही परवानगी न घेता नवीन पाइपलाइनच्या संदर्भातील काही रक्कम संबंधित ठेकेदाराला अदा केली असल्याचे समजते. दीड कोटीचे काय?रेल्वे कुरकुंभ मोरीसाठी ७ कोटी रुपये नगर परिषदेकडे आले आहेत. यातील ५ कोटी रेल्वे खात्याला दिले. ५0 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले आहेत. तेव्हा उर्वरित दीड कोटी रुपयांचे नगर परिषदेने नेमके केले काय? किंवा दीड कोटीचा निधी पडून आहे का, हे मात्र गुलदस्तात आहे. अद्याप प्रस्ताव नाहीवनसंवर्धन अधिनियमन १९८0 अंतर्गत दौंड नगर परिषदेने पाइपलाइन टाकण्यासंदर्भात प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक होते. मात्र, अद्याप प्रस्ताव दाखल न केल्यामुळे वनखात्याने पाइपलाइन टाकण्यासाठी हरकत घेतलेली आहे. त्यामुळे नगर परिषदेला पाइपलाइन टाकण्याचे काम विनापरवाना करता येणार नाही. - किशोर येळे, वनाधिकारी, दौंडदोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविलापाणीपुरवठा करणारे तळे ते जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यान वनखात्याच्या हद्दीतून पाइपलाइन टाकण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी वनखात्याकडे आॅनलाइन प्रस्ताव पाठवलेले असून, याचबरोबरीने इतर कागदपत्रांची पूर्ततादेखील केलेली आहे.- डॉ. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी, दौंड.