शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुरांच्या पगाराला फटका

By admin | Updated: November 16, 2016 03:18 IST

पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीचा फटका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या

वाघोली : पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीचा फटका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या पगाराला पडला आहे. वाघोलीमध्ये आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी बांधकाम साईटवरील मजुरांचा होणारा पगार फक्त घरखर्च, खाण्या-पिण्यापुरताच ठेकेदारांकडून करण्यात आला आहे. ठेकेदाराचीच रक्कम मिळाली नसल्याने या मजुरांकडून थोडक्यामध्ये घरखर्च भागविला जात आहे.चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजारांच्या नोटांची बदली मध्यमवर्गीय नागरिकांकडून गेल्या पाच दिवसांपासून केल्या गेल्या असल्याने मंगळवारी व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. दैनंदिन रोखीचे व्यवहार चालणाऱ्या तरकारी, मोबाईल, किराणा, खाद्यपदार्थ दुकानामध्ये सुट्या पैशांची रेलचेल वाढली असली तरी ३ ते १० हजारांच्या मध्ये होणाऱ्या एकरकमी व्यवहारामध्ये अद्यापही सुधारणा झाली नाही. याचाच फटका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे वाघोली परिसरामध्ये दिसत आहे. वाघोलीमध्ये इतर जिल्हा आणि राज्यांतून कुटुंबासह आलेल्या बांधकाम मजुरांची संख्या लक्षणीय आहे.प्रत्येक मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने या बांधकाम साईटवरील मजुरांनादेखील यादिवशी साप्ताहिक सुटी आणि आठवड्याचा पगार एकदम दिला जातो. गेल्या आठवड्याच्या मंगळवारी रात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्याचे जाहीर केले होते. गेल्या आठवड्यामध्ये मंगळवारी एक आठवडा पुरेल एवढा बाजार मजुरांनी भरला होता, तर परप्रांतीय मजुरांनी पगारातील काही रक्कम गावाकडे पाठविली आहे. बुधवारपासून नोटा बंद झाल्या असल्या तरी या मजुरांना दैनंदिन व्यवहारामध्ये याचा फटका काही प्रमाणात बसला आहे. प्रत्येक मंगळवारी होणाऱ्या पगाराच्या दिवशी मात्र सर्वाधिक फटका मजुरांना बसला आहे. बांधकाम साईटवरील ठेकेदारालाच संबंधितांकडून पैसे आले नसल्याने ठेकेदाराकडूनदेखील बांधकाम मजुरांना पगार देण्यामध्ये अडचणी येत आहेत. मजुरांना तात्पुरत्या स्वरुपात घरखर्च, खाण्यापिण्यासाठी पगार दिला गेला आहे. आर्थिक चणचण सर्वांनाच असल्याचे माहीत असल्याने मजूरवर्गानेदेखील ठेकादाराकडून खर्चासाठीचेच पैसे घेतले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. आजच्या आठवडे बाजारामध्ये मजूरवर्ग आवश्यक असणाऱ्या वस्तूच खरेदी करताना दिसत होता. (वार्ताहर)