शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तात कुंभारवळण कचरा प्रकल्प सुरू

By admin | Updated: May 13, 2016 01:19 IST

येथे सासवड नगरपालिकेला शासनाने दिलेल्या जागेत उभ्या केलेल्या घनकचरा प्रकल्पाला आज (दि. १२) सुरुवात झाली आहे.

सासवड : कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे सासवड नगरपालिकेला शासनाने दिलेल्या जागेत उभ्या केलेल्या घनकचरा प्रकल्पाला आज (दि. १२) सुरुवात झाली आहे. मात्र या प्रकल्पाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा असलेला विरोध कायम आहे. हरित न्यायालयाच्या निर्णयानुसार कुंभारवळण येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची सुरुवात झाली. या वेळी न्यायालयाच्या सूचनेनुसार मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.या वेळी पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, सरपंच गणेश कामथे, श्रीकांत ताम्हाणे, नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, पाणी पुरवठ्याचे ज्ञानेश्वर गिरमे आदी उपस्थित होते. उपस्थित आंदोलनकर्त्यांनी, या प्रकल्पाला असणारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध संपलेला नाही, तो कायम राहणार आहे. यापुढेही कायदेशीर मार्गाने लढा देणे सुरूच ठेवणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी असणाऱ्या संरक्षण भिंत, झाडे, विद्युत व्यवस्था आदी त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे झुरंगे यांनी सांगितले. दुर्वास यांनी, या ठिकाणी दररोज फक्त २ टन घनकचरा आणून त्यावर तत्काळ प्रक्रिया केली जाईल, परिसरातील नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, येत्या आठवडाभरात विद्युत सुविधा होणार आहे. परंतु जनरेटर असल्याने प्रक्रियेचे काम थांबणार नाही. या परिसरात १० हजार वृक्षलागवड करणार आहे तसेच संरक्षण भिंतीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाला भेट देऊन प्रक्रिया पाहणी करावी म्हणजे त्यांचा गैरसमज दूर होईल असे सांगतले. तसेच सहकार्य करावे असे आवाहन केले. कुंभारवळणचे सरपंच गणेश कामथे, एखतपूर-मुंजवडीचे माजी सरपंच रामभाऊ झुरंगे, महादेव टिळेकर, माणिक निंबाळकर, देविदास कामथे, शरद टिळेकर व दत्ता टिळेकर या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. (वार्ताहर)