शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हे सर्व जाती-धर्मांतील जनतेसाठी- श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:50 IST

आंबेडकर विचार मंच साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सासवड : सध्या देशात समता आणि स्वातंत्र्य आहे; परंतु बंधुत्व आहे का, हे तपासावे लागेल. कारण बंधुत्व असेल तर लोक एकमेकांना गोळ्या घालणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धर्मापुरते मर्यादित नाहीत. त्यांनी लिहिलेले संविधान हे संपूर्ण देशातील सर्व जाती-धर्मांतील जनतेसाठी आहे. त्याला कोणतेही कुंकू नाही. संविधानाचे खरे मारेकरी अशा साहित्य संमेलनांमधून शोधावे लागतील, असे परखड मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.सूर्य मावळला, की काजव्यांचे राज्य सुरू होते आणि आपण कृत्रिम प्रकाशात राहतो. त्यामुळे आपण सूर्यप्रकाशाकडे जायचे की कृत्रिम प्रकाशात राहायचे, हे ठरविले पाहिजे. अलीकडच्या काळात सांस्कृतिक आणि जातीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वांचे अवमूल्यन होत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.सासवड (ता. पुरंदर) येथे सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष पंकज धिवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राज्यमंत्री विजय शिवतारे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश पवार, सासवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिगंबर दुगार्डे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंकज धिवार, कामगार नेते ज्ञानदेव घोणे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, भीमराव कांबळे, राजेश चव्हाण, संदीप बनसोडे, दादासाहेब गायकवाड, रवींद्र वाघमारे, स्वप्निल घोडके आदी उपस्थित होते.दुपारच्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘बौद्धेतरांशिवायचे कार्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. रमेश जाधव, डॉ. संभाजी मलघे, ज्येष्ठ साहित्यिक अन्वर राजन यांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या ‘मी वादळवारा’ या संगीतमय कार्यक्रमाने संमेलनाची सांगता झाली.सासवड येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव सन्मान’ या वेळी भोर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ यांना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाजसेवा सन्मान), ज्येष्ठ उद्योजक नामदेवआबा जगताप यांना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट व्यावसायिक सेवा सन्मान).पत्रकार गणेश मुळीक यांना या वर्षापासून दिला जाणारा पहिला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता) सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला गेला.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीस