शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघ काढला पिंजून

By admin | Updated: October 6, 2014 06:38 IST

साप्ताहिक सुटीच्या रविवारी नागरिक घरी विश्रांती करणे पसंत करीत असल्याने त्यांची भेट देण्याचा उमेदवारांचा धडाका आज दिवसभर कायम होता

पिंपरी : साप्ताहिक सुटीच्या रविवारी नागरिक घरी विश्रांती करणे पसंत करीत असल्याने त्यांची भेट देण्याचा उमेदवारांचा धडाका आज दिवसभर कायम होता. पहाटे सहाला सुरू झालेल्या गाठीभेटींचा सिलसिला रात्री उशिरापर्यंत कायम होता. पायाला अक्षरश: भिंगरी लावल्याप्रमाणे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. निवडणूक आयोगाने प्रचाराला अल्प कालावधी दिला आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. सुटीमुळे कुटुंबातील सर्वच सदस्य रविवारी घरी असतात. ही संधी साधत घरोघरी गाठीभेटी घेण्याचा धडाका उमेदवारांनी लावला होता. सकाळी सहाच्या सुमारास ठरावीक कार्यकर्त्यांसह उमेदवार मैदान, पटांगण, टेकडी आणि सार्वजनिक उद्यानात निघाले. तेथे वॉकिंग, जॉगिंग व व्यायाम करणाऱ्या तरुणाईपासून ज्येष्ठांची त्यांनी भेट घेतली. हास्यक्लबमध्ये सहभागी होत थोडासा विरंगुळा करून घेतला. सकाळी लवकरच वाडी-वस्ती, चाळ, हौसिंग सोसायट्या, बाजारपेठा आदी भागांतून पदयात्रा आणि रॅली काढण्यात आली. घरोघरी जाऊन नागरिकांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. ज्येष्ठांचे वाकून आशीर्वाद घेतले जात होते. उष्म्यामुळे घामाने माखूनही चालणे बंद नव्हते. घाम पुसत आणि पाण्याचे घोट घेत पदयात्रा सुरूच होत्या. दिवसभरात संपूर्ण परिसर पिंजून काढण्याचा प्रयत्न केला गेला. रिक्षा व टेम्पोत लावलेल्या स्पीकरवरून ‘आले रे आले....,अशा पद्धतीच्या घोषणा आणि प्रसिद्ध गाण्यांच्या चालीवरील प्रचाराची टेप ऐकवली जात होती. सोबतीला ढोल-ताशाचा दणदणाट होता. सकाळी सुरू झालेली रॅली दुपारच्या कडक उन्हामुळे थांबली. उन्ह कमी होताच सायंकाळी पुन्हा नव्या दम्याने रॅली सुरू झाली. रात्री दहापर्यंत कोणत्याही स्थितीत ठरलेला भाग पूर्ण करण्याच्या इराद्याने कार्यकर्ते चालू लागले. गल्ली व कॉलनीतून फेरी मारत उंच इमारतींच्या गॅलरीत मतदारांना हात उंचावून अभिवादन करीत रॅली पुढे सरकत होती. थकल्याने काही ठिकाणी उघड्या जीप किंवा मोटारीत उभे राहून उमेदवार रॅलीत अभिवादन करीत होते. वाढते ऊन, आवाजाचा दणदणाट, गर्दी, धूळ आदीमुळे रात्रीपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते पार गळून गेले होते. रात्री दहाच्या ठोक्याला रॅली थांबविली गेली. रिक्षावरील स्पीकर बंद झाले. तेथून ठरावीक कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार निघून गेले. काही प्रमुख व्यक्तींशी भेट घेत गुप्त बैठका झाल्या, त्या मध्यरात्रीपर्यंत सुरूच होत्या.