शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

पुणे-पिंपरीच्या विकासासाठी एकत्रित ‘स्मार्ट’ शिफारस

By admin | Updated: August 1, 2015 04:36 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प व नदीसुधारणा प्रकल्पात साम्य आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या एकात्मिक विकासासाठी स्मार्ट सिटी म्हणून एकत्रित शिफारस

- हणमंत पाटील,  मुंबईपुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प व नदीसुधारणा प्रकल्पात साम्य आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या एकात्मिक विकासासाठी स्मार्ट सिटी म्हणून एकत्रित शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती प्रधान सचिव डॉ. प्रवीण परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली. केंद्र शासन पुरस्कृत ‘स्मार्ट सिटी’ अभियनाच्या अंमलबजावणीस राज्य मंत्रिमंडळाने २३ जुलैला मान्यता दिली होती. त्यानुसार मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती. राज्यातील सर्व शहरांच्या स्मार्ट सिटी योजनेच्या अहवालाचा अभ्यास करून समितीने पहिल्या टप्प्यात १० शहरांची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये मुंबईनंतर प्रामुख्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांची एकत्रित शिफारस केली आहे, असे परदेशी यांनी सांगितले. ते म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे मुळा आणि मुठा नदींवर वसलेली आहेत. त्यामुळे केवळ एका शहरातील नदीची सुधारणा करून चालणार नाही. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अखत्यारीत पुणे व पिंपरी महापालिका आहेत. दोन्ही शहरांतील नागरिकांची वाहतूक, पाणीपुरवठा, मैलापाणी प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन व अनधिकृत बांधकामांची समस्या जवळजवळ सारख्या स्वरूपाची आहे. त्यामुळे दूरगामी विकास योजनांचा विचार करून दोन्ही शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी एकत्रित शिफारस करण्यात आली आहे, असे परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था दोन्ही शहरांतून एकत्रित आहे. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पात दोन्ही शहरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित रिंगरोड याच शहरांभोवती उभारण्यात येणार आहे. दोन्ही शहरांतून जाणारे वाहतूक प्रकल्प एकाच प्रकारचे असल्याने ही योजना राबविताना एकत्रित विचार करणे हिताचे ठरेल, अशी चर्चा या वेळी करण्यात आली.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प, बीआरटी योजना व नदी सुधारणा प्रकल्पात साम्य आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत एकात्मिक स्मार्ट सिटी योजना राबविणे नागरिकांच्या हिताचे ठरणार आहे.- प्रवीण परदेशी, प्रधान सचिव.