शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

अकरा दिवसांत लाखापेक्षा जास्त खटल्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 00:44 IST

मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीसाठी वकिलांच्या कामकाज बंदचा थेट परिणाम खटल्यांवर होत आहे.

पुणे : मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीसाठी वकिलांच्या कामकाज बंदचा थेट परिणाम खटल्यांवर होत आहे. वकिलांनी छेडलेल्या या आंदोलनाचा सोमवारी अकरावा दिवस होता. मात्र, या आंदोलनाला राज्य शासन व उच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने याचा थेट परिणाम खटल्यांवर होत आहे. मागील ११ दिवसांत सुमारे एक ते दीड लाख खटल्यांवर परिणाम झाला आहे. वकिलांच्या कन्झ्युमर लॉयर कॉ-आॅपरेटीव्ह सोसायटीला दहा दिवसांमध्ये चार कोटींच्या व्यवसायाचा फटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीचा जोर धरून पुणे बार असोसिएशनने बेमुदत आंदोलन छेडले आहे. आंदोलनासाठी राज्य शासन व उच्च न्यायालयाकडून जोपर्यंत सकारात्मक प्रतिसाद लाभत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा वकिलांनी निर्धार केलेला आहे. सोमवारी आंदोलनाच्या अकराव्या दिवशीही यशस्वीरीत्या बंद ठेवण्यात आला; मात्र या आंदोलनाकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत नसल्याने त्याचा परिणाम पक्षकार, आरोपींवर होत आहे. एकट्या शिवाजीनगर न्यायालयात १४५ न्यायालये आहेत व दिवसाला १०० खटल्यांचे कामकाज चालते. याप्रमाणे मागील कामाच्या ९ दिवसांचा विचार करता दीड हजार खटल्यांवर ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. शिवाय, नव्याने दाखल होणारे दावे पूर्णत: ठप्प आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील कनिष्ठ आणि सत्र न्यायालयात दाखल खटले दाव्यांपैकी सरासरी दररोज दहा हजार खटले सुनावणीसाठी येतात. मात्र, वकिलांच्या काम बंदमुळे पुढची तारीख घेतली जात आहे. जामिनासाठी दाखल होणाऱ्या अर्जांचे आणि दाखल होणाऱ्या खासगी खटल्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. जे खटले निकालावर आले आहेत त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्वरेने या आंदोलनाकडे राज्य शासन व उच्च न्यायालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी वकील करीत आहेत.पोलिसांनी गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला २४ तासांत न्यायालयासमोर हजर करावे लागते. त्यामुळे अशा आरोपींना हजर केले जाते. आरोपींना पोलीस कोठडी हवी असल्यास पोलिसांकडून तशी न्यायालयात मागणी केली जाते. मात्र, आरोपींना त्यांची बाजू स्वत:च मांडावी लागत आहे. काहींना जामीनपात्र गुन्ह्यातही जामीन मिळण्यास अडचण येत आहे. न्यायालयाच्या आवारात असलेले द कन्झ्युमर लॉयर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्पची विक्री होते. या सोसायटीचा रोजचा व्यवहार ३० ते ४० लाखांपर्यंत होतो. तर, सोसायटीला रोज ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या १० दिवसांच्या बंदमुळे सोसायटीचे कामकाजही थंडावले आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)दुय्यम निबंधक कार्यालये, तालुका न्यायालये बंददुय्यम निबंधक कार्यालयातही वकिलांनी काम बंद ठेवले आहे. कोणतीही दस्तनोंदणी अथवा इतर कामे केलेली नाहीत. तशीच जाहीर नोटीस देणेही बंद केले आहे. तालुका न्यायालयातही बंद यशस्वी झाला आहे. तालुका न्यायालयांतही शुकशुकाटच आहे. तेथीलही कामकाज वकिलांनी पूर्णपणे बंदच ठेवलेले आहे.मनसेचा जाहीर पाठिंबापुण्यात खंडपीठाच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवाजीनगर न्यायालयात वलिकांच्या आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.बंद बेमुदतच...सोमवारी दिवसभर कामकाज बंद आंदोलनानंतर सायंकाळी ४ वाजता वकिलांनी बैैठक घेतली. या वेळी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने केलेल्या ३ ठरावांबाबत सांगण्यात आले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्याला पाठिंबा देण्याचा ठराव केला. तसेच, उच्च न्यायालयाने भेटीसाठी ७ जुलै तारीख दिली आहे. मात्र, बार कौन्सिल सचिव मध्यस्थी करून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना ७ जुलैच्या आधी भेटीसाठीची तारीख ठरवावी, अशी विनंती करणार आहेत. बार कौन्सिलच्या तीन सदस्यांची समिती स्थापून पुण्यातील बंदबाबत चौकशी करून बंद मागे घेण्यास विनंती करण्याचा ठराव केल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे यांनी सांगितले. कॉँग्रेस शहराध्यक्ष अभय छाजेड, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, शरद सोनवणे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवान वैराट यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. कामगार न्यायालय व सहकार न्यायालय यांच्या वतीने सोमवारी सकाळी खंडपीठाबाबत चर्चासत्र झाले. कामगार नेते अजित अभ्यंकर, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक , अ‍ॅड.एम. पी. बेंद्रे, अध्यक्ष अ‍ॅड. शेडगे, कामगार संघटनेचे प्रतिनिधी व वकील उपस्थित होते. हडपसर येथील वकिलांनी हडपसर ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंत दुचाकी रॅली काढली.