शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक संस्काराने जोडावे

By admin | Updated: March 3, 2016 01:23 IST

श्रीक्षेत्र नारायणपूरचे नारायणमहाराज माणसातील माणूस जागा करणारे व देशबांधवांना आध्यात्मिक संस्काराने जोडणारे होते.

पिंपरी : श्रीक्षेत्र नारायणपूरचे नारायणमहाराज माणसातील माणूस जागा करणारे व देशबांधवांना आध्यात्मिक संस्काराने जोडणारे होते. अण्णा महाराजांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श जपत थोरा-मोठ्यांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.आमदार लक्ष्मण जगताप व श्री दत्त सेवेकरी मंडळ, नारायणपूर यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील नर्मदा उद्यानात चारदिवसीय नारायण ज्ञानबोध ग्रंथवाचन सामुदायिक पारायण सोहळ्याची मंगळवारी सांगता झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार उल्हास पवार, विलास लांडे, रामलिंग स्वामीमहाराज, नगरसेवक संजय वाबळे, राजेंद्र जगताप, सुमन पवळे, माऊली लांडे आदी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘नारायणमहाराज यांनी पाच दशकाहून अधिक काळ दत्तमहाराजांची उपासना व अखंड मानवजातीची सेवा केली. गावोगावी मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण करताना ग्रामस्वच्छता व निकोप समाजनिर्मिती केली. तंटामुक्त गाव एकसंध ठेवण्याचा मंत्र त्यांनी प्रवचनातून दिला. त्यांनी शिबिराद्वारे बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा चळवळ यशस्वी करून दारिद्र्य कर्ज यातून जागृती केली. युवकांना व्यायामशाळेची पायवाट दाखविणाऱ्या सद्गुरू अण्णा महाराजांनी एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर्श जपत थोरा-मोठ्यांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली.’’दररोज सुमारे दोन हजार नागरिकांनी पारायण केले. शेवटच्या दिवशी सकाळी आठ ते दहापर्यंत ग्रंथवाचन व निरुपण, सकाळी १० ते ११ या वेळेत संकुलपूजन, सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ग्रंथदिंडी, ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. विलास लांडे, माजी नगरसेवक शंकर जगताप सहभागी झाले. दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)