इंदापूर (जि. पुणे) : काँग्रेस पक्षाला तेजस्वी वारसा आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्ष पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांतही काँग्रेस महत्त्वाच्या भूमिकेत असेल. भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजपाच्या सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला असल्याचा दावा त्यांनी केला. जुन्या व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुन्हा पक्ष संघटन मजबूत केले. त्याची सुरुवात पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवडपासून केली. त्यामुळे काँग्रेसची एक सक्षम फळी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने घोषणाबाजी, जाहिराजबाजीशिवाय काही केले नाही. शेतकरी, शेतमजूर, युवक, महिलांसह सामान्य नागरिकांसाठी काही केलेले नाही. मेक इन इंडियासारखा उपक्रम महाराष्ट्रात राबविला. त्याद्वारे ८ लाख कोटी रुपयांचे करार झाले, असे सांगितले. प्रत्यक्षात एकही करार अंमलात न आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निवडणुकांत काँग्रेस उभारी घेईल - पाटील
By admin | Updated: February 19, 2017 03:20 IST