शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वीच काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत

By admin | Updated: February 2, 2017 04:08 IST

महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आघाडीसाठी मैत्रीचा हात पुढे करताना १६२ पैकी ७१ जागा लढविण्याचा प्रस्ताव देऊन छोट्या भावाची भूमिका

पुणे : महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आघाडीसाठी मैत्रीचा हात पुढे करताना १६२ पैकी ७१ जागा लढविण्याचा प्रस्ताव देऊन छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला तयार असल्याचे स्पष्ट केले. आघाडी होण्याची शक्यता कमी झाली असली तरी एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मानसिकता पाहता महापालिकेत क्रमांक एकचा पक्ष बनण्याऐवजी क्रमांक २ च्या जागा मिळविण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे दिसून येत आहे.पुणे महापालिकेवर अनेक वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या काँग्रेस पक्षाने यंदा निवडणुकीपूर्वीच पालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याची आशा सोडून दिल्याचे चित्र दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेची सत्ता काँग्रेसकडून हिसकावून घेतली. त्यानंतर पालिकेच्या सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वर्चस्वाची लढाई राहिली होती. सध्या महापालिकेत काँग्रेस पक्षाकडेच विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येच सत्ता मिळविण्याची रस्सीखेच पाहायला मिळणे अपेक्षित होते.मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. पालिकेच्या सत्तेसाठी भाजपा व राष्ट्रवादीत चुरस असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शहरात काँग्रेस पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. पक्षाचा स्वत:चा असा परंपरागत मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. पुण्याने अनेक दिग्गज नेते देशाला दिले आहेत. मात्र या गौरवशाली परंपरेचा विसर काँग्रेसला पडल्यासारखे वातावरण यंदाच्या निवडणुकीत निर्माण झाले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आत्मचिंतन करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक होते. महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करायचीच या ईर्षेने काँग्रेस रणांगणात उतरणे अपेक्षित होते. प्रदेशपातळीवरून शहर काँग्रेसची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्यावर सामूहिकरित्या सोपविण्यात आली. मात्र सामूहिक जबाबदारीचे हा फार्म्युला तितकाचा यशस्वी झाल्याचा दिसून येत नाही. यामुळे काँग्रेस पक्षाचे पुण्याबाबतचे निर्णय वेगाने घेण्यात अडचणी येत आहेत.त्याऐवजी एकाच वरिष्ठ नेत्याकडे पुण्याची जबाबदारी दिली असती तर अधिक चांगल्या पद्धतीने काँग्रेसचे नेतृत्व पुढे येऊ शकले असते. पक्षाच्या मदतीला उभे राहण्याचा विसरकाँग्रेस पक्षाने आतापर्यंत शहरातील अनेकांना केंद्रात व राज्यात मंत्रिपद, आमदारकी, खासदारी तसेच महापालिकेची विविध पदे उपभोगण्याची संधी मिळवून दिली. मात्र आज पक्ष अडचणीत असताना त्यातले अनेक आजी माजी पदाधिकारी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी धावून येताना दिसून येत नाहीत. पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मानसिक, आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी या नेत्यांनी उचलणे आवश्यक होते, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.उर्वरित ९१ जागांवर द्यावे लागणार तुल्यबळ उमेदवारआघाडीमध्ये काँग्रेसला ७१ जागा सोडण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून राष्ट्रवादीला देण्यात आला होता. त्यामुळे या जागांसाठी काँग्रेसकडे निश्चितच सक्षम उमेदवार उपलब्ध आहेत. मात्र आता उर्वरित ९१ जागांवर तुल्यबळ उमेदवार देण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. राष्ट्रवादी यंदा आघाडीसाठी आग्रही असतानाही काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य ठरविण्याची जबादारी पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.