शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील उद्रेक कार्यकर्त्यांमध्येही

By admin | Updated: March 30, 2017 02:49 IST

आधी आमदार अनंत गाडगीळ, नंतर नवनियुक्त नगरसेवक व आता ब्लॉक अध्यक्ष, पुण्याबाहेरच्या व पुण्यातील स्थानिक

पुणे : आधी आमदार अनंत गाडगीळ, नंतर नवनियुक्त नगरसेवक व आता ब्लॉक अध्यक्ष, पुण्याबाहेरच्या व पुण्यातील स्थानिक नेत्यांविरुद्धचा काँग्रेसमधील असंतोष आता थेट कार्यकर्त्यांपर्यंत झिरपला आहे. ‘किती दिवस तेच तेच चेहरे पहायचे? नव्यांना संधी देणार आहात की नाही?’ असा उद्विग्न सवाल काही ब्लॉक अध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच विचारला आहे.या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांची मुंबईत जाऊन भेट घेतली व त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. पक्षाच्या कोथरूड ब्लॉकचे अध्यक्ष विजय खळदकर यांच्या नेतृत्वाखाली शिवराज भोकरे, सतीश पवार, सुनील घाडगे, सतीश शिंदे, राजेंद्र भुतडा यांनी चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. पराभवाला पक्षाचे आजी-माजी आमदार जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी चव्हाण यांच्याकडे केली आहे. काँग्रेसने प्रचाराचे नेटके नियोजन केले नव्हते. पक्षाचे आजी-माजी आमदार प्रचारासाठी फिरकलेच नाहीत. उमेदवारांना नेत्याविनाच प्रचार करावा लागला. वर्षानुवर्षे ज्या प्रभागांमध्ये पक्षाची मते वाढत नव्हती अशा प्रभागांमध्येही मते वाढली आहेत. मात्र, स्थानिक नेतृत्व त्याची दखल घेत नाही. तेच-तेच चेहरे दिले जातात. आता किमान स्वीकृत सदस्यासाठी तरी नव्या चेहऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.(प्रतिनिधी)विभागनिहाय बैठका घेणारमहापालिका निवडणुकीतील दारुण पराभवामुळे पक्षात असंतोषाचा लाव्हा भडकला आहे. त्याला सर्वांत आधी आमदार अनंत गाडगीळ यांनी जाहीरपणे तोंड फोडले. पक्षात दिवाणखाना संस्कृती, हॉटेल कल्चर निर्माण झाले आहे; त्यामुळेच महापालिकेत पराभव झाला. काँग्रेस भवन ओस पडले. निवडणुकीच्या महिनाभराच्या कालावधीत काँग्रेस भवनमध्ये एकही बैठक झाली नाही. नको ते पुढारी पुण्यात रस घेऊ लागले आहेत, अशी जाहीर टीका करीत गाडगीळ यांनी स्थानिक नेतृत्वाबरोबरच प्रदेशच्या नेत्यांचेही वाभाडे काढले. या सर्व गोष्टींची अखिल भारतीय काँग्रेस महासमितीकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाची बांधणी करण्यासाठी लवकरच शहरात विभागनिहाय बैठका घेणार असल्याचे गाडगीळ यांनी जाहीर केले आहे.