शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

By admin | Updated: January 12, 2016 04:07 IST

सरकारी त्रिसदस्यीय समितीने तयार केलेल्या पुणे शहराच्या विकास आराखड्याला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी आज

पुणे : सरकारी त्रिसदस्यीय समितीने तयार केलेल्या पुणे शहराच्या विकास आराखड्याला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी आज जाहीर केला. सरकारच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या आराखड्याच्या विरोधातील आक्षेपही दोन्ही काँग्रेसने आज एकत्रितपणे नगररचना संचालकांकडे लेखी स्वरूपात नोंदविले.पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना हा आराखडा तयार करताना त्यात काही जणांचे हित पाहिले गेले असल्याचा आरोप केला. मात्र, यात पुणे शहराचे अहित असल्याने या आराखड्याच्या विरोधात आंदोलनही संयुक्तपणेच करणार असल्याचे सांगितले. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेते बंडू केमसे, माजी महापौर अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, नगरसेवक संजय बालगुडे उपस्थित होते.कायद्यानुसार पालिकेला मिळणाऱ्या अ‍ॅमेनिटी स्पेस विकासासाठी खासगी व्यावसायिकांना देण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे चव्हाण म्हणाला.सन १९८७च्या आराखड्यात असलेली आरक्षणे कायम ठेवून नंतर केलेली सर्व आरक्षणे रद्द करण्यात आली. असे करायचे होते तर, मग तोच आराखडा कायम ठेवायचा होता. समिती सदस्य असलेल्या तिन्ही सरकारी अधिकाऱ्यांना पुणे शहराची काहीही माहिती नाही. त्यांना पुण्याविषयी प्रेम असायचेही काही कारण नाही; त्यामुळे त्यांनी त्यांना किंवा आणखी कोणाला तरी हवा तसा आराखडा तयार केला. साध्या रस्तारुंदीकरणाबाबत त्यांनी केलेल्या तरतुदीतून अनेकांचे व्यवसाय धुळीला मिळतील, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.रद्द केलेली सर्व आरक्षणे कायम करावीत, रस्तारुंदीकरणाबाबत फेरविचार करावा, मेट्रोसाठी दिलेला ३ एफएसआय रद्द करावा, सरकारी जागांवरचे उठवलेले आरक्षण कायम करावे या व अन्य काही शिफारशी आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवताना कराव्यात, अशी मागणी नगररचना संचालकांकडे केली आहे. तसेच, संयुक्तपणे आंदोलनही करणार असल्याचे या वेळी छाजेड व चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आराखडा तयार करण्यासाठी असलेले सर्व नियम, कायदे, सरकारी समितीने पायदळी तुडवले असल्याची टीका चव्हाण यांनी केली. शाळा, उद्याने, रुग्णालये यांसाठी ठेवलेली ३८१ आरक्षणे उठवून ४५८ हेक्टर जमीन समितीने निवासी केली. यातील काही भूखंड बांधकाम व्यावसायिकांचे आहेत; मात्र त्यात पक्षाला पडायचे नाही. हजारी लोकसंख्येमागे कशासाठी व किती आरक्षणे असावीत, या नियमाचे पालन झालेले नाही, असे वंदना चव्हाण यांनी सांगितले.