शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीत झाली अर्धमैत्री!

By admin | Updated: February 3, 2017 04:34 IST

मोठ्या संख्येने असलेले इच्छुक, कार्यकर्ते यांना झुलवत ठेवत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीसाठी ऐनवेळी आघाडी केली. १६२ जागांपैकी

पुणे : मोठ्या संख्येने असलेले इच्छुक, कार्यकर्ते यांना झुलवत ठेवत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीसाठी ऐनवेळी आघाडी केली. १६२ जागांपैकी १०० जागांवर आघाडी व उर्वरित ६२ जागांवर मैत्रीपूर्ण लढत असा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. उमेदवारांची नावे जाहीर केल्यास नाराज इच्छुक व कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, या भीतीने थेट उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीच एबी फॉर्म देण्याचाही निर्णय घेण्यात आला.गेल्या दोन आठवड्यांच्या चर्चेनंतर आघाडी होणार नाही, असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये आघाडी करण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांची यादी तयार केली होती. नेत्यांच्या आघाडी करायची या निर्णयानंतर त्याचे निरोप रात्रीच देण्यात आले. त्यामुळे गुरुवारी दिवसभर दोन्ही पक्षांचे नेते त्याच तयारीत गुंतले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना मुंबईत बोलावून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण व अन्य काही नेत्यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. उशिरापर्यंत या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. त्यात उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. (प्रतिनिधी)भाजपाने ५ विद्यमान नगरसेवकांचेच कापले तिकीट पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याच्या भीतीने भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पक्षाच्या ५ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट पक्षाने कापले आहे. -वृत्त/हॅलोपिंपरी-चिंचवडमध्ये आघाडीबाबत चर्चा : महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता. समविचारी पक्षांच्या मताची विभागणी होऊ नये, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. जागा वाटपावरून बुधवारी चर्चा फिस्कटली होती. मात्र, गुरूवारी पुन्हा चर्चा सुरू झाली. दोन्हीही पक्ष याबाबत सकारात्मक असले तरी रात्री उशीरापर्यंत निर्णय झालेला नाही.स्थानिक नेते तडजोडीस प्रतिकूल असल्याने निर्णयज्या प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांना चारही जागा हव्या होत्या, असे एकूण ७ प्रभाग होते. त्यात कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७, लोहियानगर येथील प्रभाग क्रमांक १९, वानवडी येथील प्रभाग क्रमांक २५ तसेच शिवाजीनगर व अन्य काही परिसरातील प्रभागांचा समावेश होता. पक्षाचे अस्तित्व ठेवायचे असल्याने त्यावर तडजोड करण्याची स्थानिक नेत्यांची तयारी नव्हती. ते लक्षात घेऊन या प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, आघाडी असलेल्या १०० जागा व मैत्रीपूर्ण लढत होणाऱ्या ६२ जागा यांचा तपशील दोन्ही पक्षांकडून मिळू शकला नाही. यादी जाहीर न करता पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठीचा एबी फॉर्म थेट उमेदवारी अर्ज दाखल करतानाच द्यायचा, असे ठरवले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अद्याप नेत्यांनी तपशील दिलेला नाही, असेच सांगण्यात येत होते. मुंबईत झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावरून नेत्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली असल्याची माहिती मिळाली. तुलनेने राष्ट्रवादीची बैठक शांततेत पार पडली.