शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

कॉँग्रेस-राष्ट्रवादी आज पुन्हा बैठक

By admin | Updated: January 22, 2017 04:49 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११६-४६च्या प्रस्तावाला उत्तर म्हणून काँग्रेसने १०१-६१चा प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तयार केलेल्या या प्रस्तावाला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११६-४६च्या प्रस्तावाला उत्तर म्हणून काँग्रेसने १०१-६१चा प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तयार केलेल्या या प्रस्तावाला वरिष्ठ नेत्यांनीही मान्यता दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा होईल, असे सांगण्यात आले. ही बैठक शनिवारी रात्री उशिरा किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करायची किंवा नाही, यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील चर्चा अडकली आहे. ११६ जागा राष्ट्रवादी काँग्रेस व ४६ जागा काँग्रेस असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेसला देण्यात आला होता. त्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे चर्चेला पायबंद बसला. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या निवासस्थानी जाऊन ही कोंडी फोडली. त्या वेळी कोणत्या पक्षाचे कोणत्या जागांवर वर्चस्व आहे याचा प्रस्ताव तयार करण्याचे ठरले होते. त्यानंतर संयुक्त बैठक झाली नाही; पण दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे बैठका घेतल्या. (प्रतिनिधी) निम्म्याच प्रभागावर चर्चा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अ‍ॅड़ वंदना चव्हाण यांनी शनिवारी प्रभागनिहाय चर्चेला सुरुवात केली़ सुमारे २ तास चाललेल्या या चर्चेत ४१ प्रभागापैकी अर्ध्याच्या प्रभागांवर चर्चा पूर्ण झाली़ त्यानंतर उरलेल्या प्रभागावर रविवारी पुन्हा चर्चा करण्याचे ठरविण्यात आले़ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्या कमी जागांवर आघाडी मान्य करू नये, असा आग्रह धरला. पालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी तर जाहीरपणे विरोध दर्शवून पक्षाला चांगली संधी आहे, असे मत व्यक्त केले. बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आहे; त्यामुळे आघाडीसाठी आग्रही आहे, असे सांगितले. मागील ५ वर्षांत त्यांनी सत्तेत बरोबर घेऊन काँग्रेसची फक्त फसवणूकच केली आहे; त्यामुळे जागा वाढवून मागाव्यात, असे त्यांनी सुचविले.त्याप्रमाणे शिंदे व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी १०१ व ६१ असा प्रस्ताव तयार केला आहे. काँग्रेसची आरपीआयच्या कवाडे गटाबरोबर युती आहे. ६१ मधील काही जागा त्यांना देता येतील अशा घ्याव्यात, असेही सुचविण्यात आले. हा प्रस्ताव घेऊन आता काँग्रेसचे शहराध्यक्ष बागवे तसेच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार चव्हाण यांची भेट घेणार आहेत. आघाडीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असून लवकरात लवकर त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. - रमेश बागवे, शहराध्यक्ष कॉँग्रेस काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी रात्री अर्धवट चर्चा झाली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दोन दिवसांत पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. - खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी