शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

काँग्रेस ही एक चळवळ; देशहितासाठी कार्यरत : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:10 IST

आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे.

पुणे : आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत, त्यांचा गांधीजींच्या विचारांनीच मुकाबला केला पाहिजे, काँग्रेस ही एक चळवळ आहे आणि देशाच्या हितासाठी ती सदैव कार्यरत राहील, अशा शब्दांत देश काँग्रेसमुक्त करण्याची वल्गना करणाºया मोदी सरकारवर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी टीकास्त्र सोडले.१९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन ते टिळक पुतळा महात्मा फुले मंडईपर्यंत क्रांतिज्योत यात्रा काढण्यात आली. मंडई येथे सभा घेऊन या यात्रेचा समारोप करण्यात आला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, बाळासाहेब दाभेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, शेखर कपोते, कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर, सोनाली मारणे आदी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.१९४२ च्या गांधीजींच्या चले जावच्या नाºयामुळे देशातील लाखो सत्याग्रही चळवळीमध्ये सहभागी झाले. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांनी गांधीजींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. त्यानुसार गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडण्याचे आवाहन केले. ८ आॅगस्टच्या रात्री सर्व दिग्गज काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली आणि ९ आॅगस्ट १९४२ ला २३ वर्षीय युवती अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गोवालिया टँक मैदान येथे तिरंगा फडकविण्यात आला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देशात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. लोकशाहीला संपविण्याचे काम जर कोणी करीत असेल तर १२५ कोटी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.- श्रीपाल सबनीस,माजी अध्यक्ष, अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन