शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामित्वाच्या केंद्रस्थानी काँग्रेस

By admin | Updated: February 17, 2016 01:34 IST

कॉँग्रेसमधील लोक आपल्या आजूबाजूला पुरोगामित्व असणाऱ्यांना ठेवून स्वत: त्याच्या केंद्रस्थानी राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करावे लागत नाही

पुणे : कॉँग्रेसमधील लोक आपल्या आजूबाजूला पुरोगामित्व असणाऱ्यांना ठेवून स्वत: त्याच्या केंद्रस्थानी राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करावे लागत नाही. इतर लोकांचा पुरोगामित्वाचा प्रकाश त्यांच्यातून परावर्तित होतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. शिक्षक हितकारणी संघटना आणि लोकवाङ्मय गृह यांच्या वतीने मंगळवारी आयोजिण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. राकेश वानखेडेलिखित ‘पुरोगामी’ या कादंबरीवर चर्चा करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, प्रसिद्ध साहित्यिक राजन खान, डॉ. प्रकाश पवार व लेथक राकेश वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘भारतीय वास्तव हे जटिल असून अनेक विचारप्रणाली एकाच साच्यात बसविल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. पुरोगामींमध्ये अंतर्गत असणाऱ्या स्पर्धेमुळे संघर्ष वाढतो. त्यामुळे एकाच विचारप्रणालीत अनेक गट पडतात. कम्युनिझम आणि आंबेडकरवादी बुद्धिझम हे दुहेरी नाते असून त्यात समन्वय आणि संघर्ष दोन्ही आहे. जातीतील वर्ग आणि वर्गातील जाती शोधल्या तर भारतीय व्यवस्थेचे आकलन करणे अधिक सोपे होईल.’’आंबेडकर आणि मार्क्स या दोन विचारप्रणालींमध्ये समन्वय होणे गरजेचे आहे. आंबेडकरांनी बौद्ध धर्मात धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि राजकीय संदर्भ सांगितले आहेत. आंबेडकरांचा धर्मांतराचा विचार व्यापक असून त्यात अनेक टप्पे आहेत, असे डॉ. मोरे म्हणाले.वानखेडे, डॉ. पवार आणि उत्तम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)