शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

काँग्रेस काळ्या पैशांच्या बाजूने - प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 04:08 IST

काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारने मागील वर्षी ८ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा दिवस भारतीय जनता पक्ष काळा पैसा विरोधी दिन म्हणून साजरा करणार आहे.

पुणे : काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारने मागील वर्षी ८ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा दिवस भारतीय जनता पक्ष काळा पैसा विरोधी दिन म्हणून साजरा करणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून काळ््या पैशाचे समर्थन करणारे आंदोलन केले जाणार आहे, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे केली.काँग्रेसच्या काळात जनतेला ज्यांनी लुटले त्यांच्याच बाजुने पक्षा उभा राहत आहे. काळा पैसा विरोधी दिनानिमित्त देशभरात व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, जनजागरण मोहीम, डिजिटल साक्षरता असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ५०० व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर १६ हजार कोटी रुपये परत आले नाहीत. २ लाख बनावट कंपन्यांची खाती गोठविण्यात आली. सुमारे ३ लाख कोटींचे ४ लाख ७१ हजार व्यवहार संशयास्पद आढळून आले. तसेच विविध देशांशी करार, नवीन कायदेही करण्यात आले. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन सत्तेच्या दलालांचे दुकान संपुष्टात आले, असे ते म्हणाले.वस्तू व सेवा कर (जीएसटी) हे सर्व पक्षांचे अपत्य आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ७० वर्षांची पद्धत बदलतानाकाही अडचणी येतात. जीएसटी परिषदेमध्ये त्यावर चर्चा होऊन अडचणी दूर केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.