शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांचा गोंधळ

By admin | Updated: February 22, 2017 03:11 IST

मतदार याद्यांचा अनुक्रमांक बदलल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये

वाघोली : मतदार याद्यांचा अनुक्रमांक बदलल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये मतदानाच्या दिवशी पाहावयास मिळाले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम यादी गटामध्ये एकत्रित अनुक्रमांकानुसार निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली असली, तरी मतदार विधानसभेच्या यादी भागानुसार शोधत होते. यामुळे मतदान केंद्र शोधताना मतदारांचे प्रचंड हाल झाले.वाघोली-आव्हाळवाडी गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाल्यानंतर, तत्काळ नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. सकाळी मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांनी विधानसभेच्या यादी भाग क्रमांकानुसार अनुक्रमांक सांगितला असता, अनेकांचे क्रमांकच चुकीचे निघाले. जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानासाठी आलेल्या नागरिकांना सातव हायस्कूलमध्ये पाठविण्यात येत होते, तर सातव हायस्कूलमधून जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठविण्यात येत होते. अनेक मतदारांमध्ये सकाळपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारांना देण्यात आलेल्या याद्यांच्या साहाय्याने व निवडणूक आयोगाच्या मदत केंद्राच्या मदतीने नागरिकांना यादीतील अनुक्रमांक सांगण्यात आले. मात्र, यामध्ये वृद्ध, महिला आणि अपंगांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, तर वॉर्ड क्रमांक तीनमधील काही नावे वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गेल्याने अनेकांचा गोंधळ उडाला.मतदार याद्यांचा घोळ निर्माण झाला असला, तरी सकाळपासून मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषद गटातील वाघोलीसह केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, भावडी, तळेरानवाडी या गावांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत उत्साहाचे वातावरण होते. (वार्ताहर)गटात ७० टक्के मतदान वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सरासरी ७० टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी असणारा उत्साह जाणवून येत असल्याने ७० टक्क्यांच्या वर मतदान होईल, असा उमेदवारांनी व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला.वॉर्ड क्रमांक ६ हाउसफुल्ल खुल्या प्रवर्गासाठी असणाऱ्या आव्हाळवाडी पंचायत समिती गणामध्ये वाघोलीतील वॉर्ड क्रमांक सहा येत असल्याने, या ठिकाणी सर्वच उमेदवारांच्या नजरा लागून होत्या. वाघोलीत सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून वॉर्ड क्रमांक ६ च्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अगदी मतदानाची वेळ संपेपर्यंत नागरिकांनी गर्दी केल्याने दिवसभर हा वॉर्ड हाउसफुल्ल होता.