शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या मालकीबाबत गोंधळ?

By admin | Updated: November 17, 2016 02:01 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मालकीबाबत सावळा गोंधळ आहे.

उरुळी कांचन : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मालकीबाबत सावळा गोंधळ आहे. उरुळी कांचन परिसरात जिल्हा परिषदेने खर्च करून बांधलेल्या शाळांच्या जागा या जिल्हा परिषदेच्या वा पंचायत समितीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या नावावर नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मागितलेल्या कागदपत्रांवरून उघड झाली आहे. नियमानुसार जिल्हा परिषदेच्या नावावर असणे क्रमप्राप्त असताना प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभाराने या भागातील तत्कालीन दानशूर व शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या बुजुर्गांनी दिलेल्या सध्यस्थितीतील लाखो रुपये किमतीच्या जागा केवळ स्थानिकांच्या दादागीरीनेच आहे त्या अवस्थेत जागा कशीबशी ताब्यात ठेवण्याची कसरत ज्या त्या ठिकाणच्या शिक्षकांना करावी लागत आहे.उरुळी कांचन परिसरात गावठाण (उर्दू शिक्षण शाळा), तुपे वस्ती, खेडेकर मळा, टिळेकर मळा, पांढरस्थळ, दत्तवाडी, आश्रम रोड या जिल्हा परिषदेच्या वतीने चालविलेल्या प्राथमिक शिक्षणासाठीच्या शाळा आहेत. या शाळांच्या जागांच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ च्या दप्तरी जिल्हा परिषद शाळा व पुढे ठिकाणचा उल्लेख आहे. पण, या जागांच्या ७/१२ च्या उताऱ्यावर फक्त पीक पाण्याच्या नोंदी सदरात शाळा पट अशा नोंदी आहेत. यापैकी पांढरस्थळातील शाळा तर ज्या गटातील जागा शाळेसाठी भूमिदान म्हणून बक्षीस पत्राने दिल्या आहेत. त्या गटातील जागांवर शाळा न बांधता दुसऱ्याच गटातील जागांवर शाळा बांधून त्याची बक्षीसपत्रेदेखील चुकीचे गट नंबर टाकून केल्याचे ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या कागदपत्रावरून दिसत आहे. वरीलपैकी फक्त आश्रम रोडवरील शाळेच्या जागेची नोंद भूमिदानाने मिळालेल्या जागेच्या गटावर आहे. पण, क्षेत्राचा ताळमेळ बसत नाही, अशीही गोची आहे, तोच प्रकार इतर ठिकाणच्या शाळांच्या जागांबाबत आहे. पण अधिकारीवर्ग त्याकडे लक्ष देताना दिसत नाही, हे वास्तव आहे. पांढरस्थळातील शाळा गेले कित्येक दिवस कम्पाउंडवॉलच्या प्रतीक्षेत आहे. पण शिंदवणे हद्दीतील एक धनदांडगी व्यक्ती शीव हद्द ओलांडून म्हणजे शिंदवणे व उरुळी कांचन या दोन गावांच्या शीवेवर असलेला रस्ता सोडून उरुळी कांचनच्या हद्दीत आमचीच जागा आहे, असे सांगत या कामात अडथळा आणत आहे.(वार्ताहर)