शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे भाजपातील वाद प्रदेश पातळीवर

By admin | Updated: January 12, 2016 04:04 IST

पक्षातील संघटनात्मक निवडीवरून भारतीय जनता पक्षामध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या वादात आणखी एक ठिणगी पडली आहे.

पुणे : पक्षातील संघटनात्मक निवडीवरून भारतीय जनता पक्षामध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या वादात आणखी एक ठिणगी पडली आहे. महापालिकेच्या निवडणुका समोर ठेवून पक्षाकडून बापटसमर्थक असलेले महेश लडकत यांची सह निवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यास शिरोळे यांचा विरोध कायम असून, लडकत यांची नियुक्ती रद्द करावी, असे पत्रच खासदार शिरोळे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांना पाठविले असल्याचे समजते. यावरून भाजपामधील अंतर्गत वाद आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अवघ्या वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सह निवडणूकप्रमुख तसेच सहा सरचिटणिसांची निवड करण्यात येणार होती. या बैठकीत सह निवडणूकप्रमुख म्हणून महेश लडकत यांची वर्णी लावण्याची शिफारस बापट यांनी केली होती. त्याला शिरोळे यांनी विरोध केला. लडकत यांची निवड आपल्याला तसेच इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करण्यात आली नसल्याचा आक्षेप खासदार शिरोळे यांनी घेतला होता. त्यावरून बापट आणि शिरोळे यांच्यात ठाकूर यांच्यासमोराच शाब्दिक खडाजंगी झाली होती. या वादाची चर्चा ताजी असतानाच, आता शिरोळे यांनी थेट लडकत यांची नियुक्ती करू नये. पक्षाकडून समितीत नेमण्यात येणाऱ्या इतर सहा सरचिटणीसपदांवरील कोणत्याही व्यक्तीची निवड लडकत यांच्या जागी करावी, अशी मागणी करणारे पत्रच वरिष्ठांना पाठविले आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी शिरोळे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)