शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच

By admin | Updated: March 31, 2017 23:55 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने

बावडा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने कर्जमाफीसाठी संघर्ष करावाच लागणार आहे. कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सरकारविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे मंगळवारी (दि. २८) सभेत बोलताना दिला आहे. बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे १६.५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची भूमिपूजने हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये लागतील. राज्य सरकारविरोधात संघर्ष करून कर्जमाफी जाहीर करण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडू, असा आत्मविश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखविला. या वेळी गावातील आंबेडकर चौक ते काळेश्वर मंदिर व हनुमाननगर येथे रस्ता काँक्रिटीकरण व भैरवनाथ मंदिर घोडे ठेवणेसाठी सभामंडप बांधणे या कामांचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. प्रारंभी बावडा ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या रत्नप्रभादेवी पाटील व पंचायत समितीच्या सदस्या रोहिणीताई घोगरे यांचा सत्कार सरपंच निरूपमा शिंदे, उपसरपंच अमोल घोगरे यांनी केला.पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या वतीने निघत आहे. या संघर्ष यात्रेचा शुभारंभ बुधवारपासून (दि. २९) होत आहे. या कार्यक्रमास मी उपस्थित राहणारआहे. या वेळी प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, श्रीमंत ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच निरुपमा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. आनंदराव पाटील हे होते. अमर निलाखे यांनी सूत्रसंचालन केले. तर चाँद सय्यद यांनी आभार मानले.संपूर्ण बावडा गाव १०० टक्के निर्मलग्राम झाले आहे. गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांनी झटून चांगले काम केले. शौचालयांच्या १०० टक्के वापरासाठी आगामी काळात सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे भगवान घोगरे, अंबिका पावसे, योगेश जगताप, बाळासाहेब जाधव, उत्तम मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांशी भेटून आम्ही केली आहे. शेटफळ तलावाचे पाणी हे शेतकऱ्यांना बंद पाईपलाईनने देणेकरिता जलसंपदा विभागाने वनगळी येथील एस. बी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला डिझाईन व प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. बंद पाइपलाइनमुळे शेतकऱ्यांना जादा आर्वतने मिळतील, - हर्षवर्धन पाटील