शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त गाळ्यांची मोजणी आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2015 00:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांच्या वतीने उद्या दि़ २१ रोजी नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या वादग्रस्त ६१ गाळ्यांची मोजणी करण्यात येणार आहे.

नारायणगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांच्या वतीने उद्या दि़ २१ रोजी नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या वादग्रस्त ६१ गाळ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. मोजणीला ग्रामपंचायत व एक स्थानिक नेता विरोध करण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात मोजणीची तयारी केलेली आहे़ मोजणीसाठी ५० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात असल्याने या मोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे़ ही मोजणी सकाळी ९.०० वाजता सुरू होणार असून, नारायणगाव एसटी बसस्थानकालगत असणाऱ्या जुन्नर रस्त्यात साधारण १ कि़ मी़ रस्त्याची मोजणी करण्यात येणार आहे़, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नरचे उपविभागीय अभियंता गणेश पोहेकर यांनी दिली़ या मोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार असून, नारायणगाव-जुन्नर रस्त्यावर बेकायदा जमावबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली़सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दि़ ७ डिसेंबर रोजी नारायणगाव-जुन्नर-मढ राज्य महामार्ग क्ऱ १११ वरील वादग्रस्त ६१ गाळ्यांची मोजणी करण्यात येणार होती़; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने व पोलीस बंदोबस्ताअभावी ही मोजणी स्थगित करण्यात आली होती़ या मोजणीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने अतितातडीची मोजणीकरिता भूमिअभिलेख विभागाकडे ५७ हजार रुपये मोजणी फी भरलेली आहे़ मोजणी स्थगित झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा तत्काळ मोजणी करून घेण्यासाठी पोलीस व भूमिअभिलेख विभागाशी पत्रव्यवहार करून अंतिम मोजणीसाठी दि़ २१ डिसेंबर २०१५ ही तारीख निश्चित केली आहे़ या मोजणीदरम्यान या गाळेधारक व जागामालक, व्यावसायिक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही उपस्थित राहू न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे़ या मोजणीदरम्यान नारायणगाव पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये व बेकायदा जमाव जमवू नये, बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी या परिसरात वरिष्ठांच्या परवानगीने जमाव बंदी लागू केली आहे़ (वार्ताहर)