शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘रायसोनी’च्या संचालकांवर येणार जप्ती

By admin | Updated: March 18, 2016 03:19 IST

अवसायनात काढण्यात आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पंतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता जप्ती करून, त्याची विक्री करण्याचा प्रस्ताव अवसायक जितेंद्र कंडारे यांनी

पुणे : अवसायनात काढण्यात आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पंतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता जप्ती करून, त्याची विक्री करण्याचा प्रस्ताव अवसायक जितेंद्र कंडारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या प्रस्तावात संचालकांच्या २६ मालमत्तांच्या जप्तीची शिफारस करण्यात आली आहे. रायसोनी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे बँक बंद करण्यात आली होती. राज्याच्या विविध भागांमध्ये शाखा असणाऱ्या या पतसंस्थेत २८ हजार खातेधारक आणि ठेवीधारकांचे सुमारे १२०० कोटी रुपये अडकले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र जनसंग्राम संघटनेच्या वतीने येत्या २७ मार्चला दुपारी १२ वाजता कौन्सिल हॉलच्या बाजूच्या आयबी गेस्ट हाऊस येथे ठेवीदारांची बैठक बोलविली आहे, अशी माहिती ठेवीदार समन्वय समितीचे राज्य संघटक दामोदर दाभाडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पावटेकर व समन्वयक सचिन पार्टे यांनी दिली. २६ मालमत्ता जप्तीची शिफारसयाप्रकरणी सहकार खात्याने पतसंस्थेची चौकशी करून त्यावर अवसायक नेमला होता. एमपीआयडी कायद्यानुसार अवसायक जितेंद्र कंडारे यांनी बँकेच्या संचालकांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा आणि ठेवीदारांचे पैसे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या प्रस्तावात संचालकांच्या २६ मालमत्तांच्या जप्तीची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली जाणार असून, या समितीच्या माध्यमातून मालमत्तांची जप्ती व विक्रीची कारवाई केली जाईल.